Saturday, 9 September 2017

वराडा येथील शेतकर्याची कर्जापायी आत्महत्या

नागपूर ,दि.09-कर्जाला कंटाळून नागपूर जिल्ह्यातील वराडा येथील शेतकरी सोमेश्‍वर वरठी (४१) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना वराडा गावात शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी घडली. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली व एक छोटा मुलगा आहे.
कन्हान नजिक असलेल्या वराडा येथील शेतकरी सोमेश्‍वर तुळशीराम वरठी यांच्याकडे तीन एकर शेती वाघोली शिवारात आहे. त्यांनी कपाशी लावलेली आहे. त्यांच्यावर जव.ळपास अडीच ते तीन लाख रुपयांचे बँकेचे व खासगी कर्ज होते. गेल्या दोन वर्षांपासून होणारी सततची नापिकी तसेच यावर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे सोमेश्‍वर पुर्णत: खचले होते. पेंच धरणातून पाणी सोडण्यास प्रशासनाने नकार दिल्याने आलेले पीकसुद्धा हाती येण्याची शाश्‍वती राहिली नव्हती यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे कळते. गुरुवार ७ सप्टेंबरला फवारणीकरिता सोमेश्‍वर शेतात पत्नी व भावसुनेला घेऊन गेले. ते कपाशीवर औषध फवारणी करत होते. पत्नी व भावसुन दुरून पाणी आणत होत्या. या दरम्यान सोमेश्‍वरने फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. औषध पिताच ते जमिनीवर कोसळले. यामुळे लगेच पत्नी व सुनेने त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शुक्रवारी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...