Monday, 4 September 2017

फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत

तुमसर दि.04 : गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत झाला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात ही हृदयद्रावक घटना घडली. मुस्कान धनराज सरीयाम (९), प्रणय धनराज सरीयाम(१०) व सारिका छबीलाल सरीयाम (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.या भावंडांनी काठावर काढून ठेवलेले कपडे दिसल्याने ग्रामस्थांनी तलावात शोधाशोध सुरू केली. अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळ येत होते. अखेर ८ च्या सुमारास तिघांचे मृतदेह काढून उत्तरीय तपासणी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...