नागपूर,दि.05-क्षुल्लक वादासंदर्भातील गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी एका भाजीपाला विक्रेत्यास पंधराशे रुपये लाच मागणार्या वाडी ठाण्याच्या एका पोलिस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस वतरुळात खळबळ उडाली आहे. राजेश बदोले (३२) असे आरोपी शिपायाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती रोड आठवा मैल परिसरातील आठवडी बाजारात ३१ ऑगस्टला हा भाजीपाला विक्रेता दुकान लावण्यासाठी गेला होता. दुकान लावण्यावरून त्याचा दुसर्या भाजीपाला विक्रेत्यासोबत वाद झाला. हा किरकोळ वाद पोलिसापर्यंत पोहोचला. वाडी पोलिसांनी तक्रारकर्त्याविरुद्ध ‘अदखलपात्र’ नोंद करीत दोघांनाही समज दिली. वाद झाला तेव्हा वाडी पोलिस ठाण्याचा शिपाई आरोपी राजेश तेथे होता. तो भाजीपाला विक्रेत्यास ठाण्यात घेऊन गेला होता. कारवाई न करण्यासाठी राजेशने त्याला १ हजार ५00 रुपये मागितले. एवढे पैसे नसल्याचे भाजीपाला विक्रेत्याने सांगितले. काही वेळानंतर राजेशने पैशासाठी भाजीपाला विक्रेत्यास संपर्क साधत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.
आज सोमवारी भाजीपाला विक्रेत्यास बाजारात दुकान लावायचे होते. राजेशने त्याच्याशी संपर्क साधून पुन्हा पैशांची मागणी केली. त्याला पैसे घेण्यासाठी बाजारात बोलाविले. भाजी विक्रेत्याने एसीबी कार्यालय गाठून तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने बाजारात सापळा रचला. राजेशने तेथे पोहोचून फिर्यादी भाजीपाला विक्रेत्याकडून रक्कम घेताच ‘एसीबी’च्या पथकाने आरोपी राजेशला रंगेहात अटक केली. राजेशविरुद्ध वाडी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, शिपाई लक्ष्मण परतेती, प्रभाकर बले, अमोल फिस्के आणि परसराम साही यांनी कारवाई केली.

No comments:
Post a Comment