पुणे, दि. 9 - हिंदू जनजागृती समितीचे पत्राचा आधार घेत महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा संतापदायक प्रकार उजेडात आला आहे.
सोवळं प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल होणे, त्यापाठोपाठ सुधारणावादी उपक्रम बंद करून जुन्या रिती सुरु ठेवण्याचे आदेश काढणे अशा घटनांमुळे आपली अश्मयुगाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असल्याची जळजळीत प्रतिक्रिया अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
हिंदू जनजागृती समितीने उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक विजय नारखेडे यांना २८ ऑगस्ट रोजी एक पत्र दिले दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी अशी मागणी केली होती.
त्यावर सह संचालकांनी लगेच कृती करीत महाविद्यालयांनी या पत्रानुसार योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश काढले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सह संचालकांचे हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनीही विधार्थी यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये असे निर्देश सर्व महाविद्याल्याना दिले आहेत.
अंनिसच्या पर्यावरण पूरक विसर्जन मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालिन आघाडी सरकारने हा कार्यक्रम महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता. उच्च शिक्षण विभागाने हिंदू जनजागृती समितीची मागणी मान्य करून त्याला हरताळ फसला आहे.
सोवळं प्रकरणी गुन्हा दाखल होण, पर्यावरण पूरक विसर्जनाला तिलांजली देणं अशा घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. त्यानंतर धर्माचा आधार आहे म्हणून शासनाने सती प्रथा सुरू करावी व पुन्हा अश्मयुगाकडे वाटचाल करावी अशी प्रतिक्रिया अंनिसचे प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment