धर्मशाला,06 : हिमाचल प्रदेश मधील निवडणूकीत विरोधकांवर तोंडसुख घेणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला. मोदींच्या ‘मित्रों’ या पालुपदाने लोकांच्या मनात आता धडकी भरली असल्याचा टोला लगावला.
गुजरातमधील प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ची फोड ‘गब्बर सिंग टॅक्स’ अशी केली होती. तेच सूत्र पकडून पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला येथील प्रचार सभेत मोदींची तुलना ‘शोले’ चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग या डाकूशी केली. गब्बर सिंगने ‘कितने आदमी थे’ असे विचारले की, लोकांचा भीतीने थरकाप उडायचा. तशीच मोदींच्या ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली आहे. कारण आता नशिबी काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना भीती वाटते, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment