Thursday, 16 November 2017

फुजीफिल्म इंडियाने वेग, दर्जा आणि हमीचा अनोखा संयोग साधणारा हायब्रिड प्रिंटर केले लाँच

Product Image

मुंबई,(विशेष प्रतिनिधी) – फुजीफिल्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने नुकतेच मुंबईत वाटड फॉरमॅट इंकजेट प्रिंटर्ससाठीच्या अद्ययावत डेमो सेंटरमध्ये नवीन यूव्हीस्टार हायब्रिड 320 सुपर लाँच केला. यूव्हीस्टार हायब्रिड 320 हा अनेक प्रकारच्या डिसप्ले प्रती छापू शकणारा यूव्ही प्रोडक्शन प्रिंटर आहे. असे माहिती फुजीफिल्म इंडिया कडून देण्यात आली आहे.

3.2 मीटरच्या या नवीन यूव्हीस्टार हायब्रिड 320 मध्ये फ्लॅटबेड आणि रोल प्रिंटर यांचा मिलाफ सहलेला असून प्रति तास 201 चौरस मीटर एवढ्या वेगाने हा प्रिंटर दर्जेदार प्रती छापू शकतो. फुजीफिल्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यासुनोबु निशियामा यावेळी म्हणाले की, यूव्हीस्टार हायब्रिड 320 लाँच करून आम्ही भारतातील ग्राफिक आर्ट बाजारपेठेतील स्थान बळकट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय बाजारपेठेत फुजीफिल्मची वाढ होण्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे ग्राफिक आर्ट व्यवसाय आमच्या जागतिक दर्जाच्या छपाई तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही दर्जेदार, तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत छपाई सामुग्री देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या योगे आम्ही छपाई व्यावसायिकांना स्पर्धात्मक विकास करण्यात व व्यवसाय वाढवण्यात मदत करू शकू. नवीन यूव्हीस्टार हायब्रिड 320 हे या वाटचालीतील तर्कशुद्ध पद्धतीने उचललेले पुढील पाऊल असून सुपर वाइड बाजारपेठेतील छपाई व्यावसायिकांना त्यांच्या कामाचा दर्जा व निर्मिती क्षमता वाढवून त्याद्वारे व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल याची काळजी यूव्हीस्टार हायब्रिड 320 घेतो असे फुजीफिल्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्राफिक आर्ट विभागाचे कार्यकरी उपाध्यक्ष एस. एम. रामप्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
@ यूव्हीस्टार हायब्रिड 320 महत्त्वाची वैशिष्ट्ये
# 3.2 मीटर पर्यंत रोल आणि रिजिड मिडिया क्षमता
# प्रिंट काढण्याची क्षमता प्रतितास 2163 चौरस फुट
# दर्जेदार प्रतिमांसाठी दहाहून अधिक ड्रॉपसाइज, मल्टी-पल्स जेटिंगसह बहुस्तरीय यूव्हीजेट शाईचा व्यापक पल्ला
# फिके रंग, भगवा व पांढरा नियमित
# सहा भागांची वातप्रणाली ( व्हॅक्युम सिस्टम )
# सातत्यपूर्ण शीट व रोल छपाई
# मल्टी-शीट छपाई

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...