Thursday, 16 November 2017

कुºहाडीने वार करून पतीने केली पत्नीची हत्या

अहेरी ,दि.15- पतीने कुºहाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना आज १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता अहेरी येथील पेट्रोलपंप परिसरातील घडली.  पेंटय्या व्येंका कोडाप (६५) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर ईराबाई पेंटय्या कोडापे (५०) असे मृतक पत्नीचे नाव आहे. आरोपी पेंटय्या हा  हत्या केल्यानंतर स्वत:  पोलिस ठाणे गाठून हत्या केल्याची कबुली दिली.
प्राप्त माहितीनुसार पेंटय्या हा आपल्या पत्नीसह अहेरी शहरातील राजा पेट्रोल पंप परिसरात वास्तव्याने राहत होता. आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास पत्नी ईराबाई खाटेवर झोपली असताना तिच्या मानेवार धारदार कुºहाडीने वार केला. यात ईराबाई जागीच ठार झाली. त्यानंतर आरोपी पेंटय्या हा स्वत: पोलिस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक सुरेश मदने, पोलिस उपनिरीक्षक चामे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केला असता ईराबाई कोडाप ही खाटेवर मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनासाठी अहेरी येथील ग्रामीण रुग्णालया पाठविले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पेंटय्या कोडाप यांच्या विरोधात भादंवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.  पेंटय्या याने संशयावरून पत्नी ईराबाईची हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. घटनेचा पुढील उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुरेश मदने करीत आहेत.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...