Sunday, 12 November 2017

चित्रकुट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विजयी

संग्रहित छायाचित्रचित्रकूट,दि.12-मध्यप्रदेशातील चित्रकूट विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलांशू चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाल त्रिपाठी यांचा १४,३३३ मतांनी पराभव केला. चतुर्वेदींना ६६,८१०, तर त्रिपाठींना ५२,४७७ मते मिळाली.
काँग्रेसचे आमदार प्रेम सिंह यांच्या निधनानंतर चित्रकूट विधानसभा मतदारसंघासाठी ९ नोव्हेंबरला मतदान झाले होते. ६२ टक्के मतदान झाले होते. भाजप आणि काँग्रेसमध्येच चुरस होती. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी पुन्हा काँग्रेसलाच कौल दिला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...