देवरी दि.11 (तालुका प्रतिनिधी)- देवरी पासून 30 किलोमीटर अंतरावरील ककोडी चिलाटी येथे धानाचे भारे वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ला शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. ट्रॅक्टरचालकाने प्रसंगाअवधान राखत ट्रॅक्टरचे इंजिन ट्रॉलीपासून वेगळे करण्यात आले. परिणामी मोठी जीवित हानी टळली. लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले असले तरी शेतकऱ्याचे धानाचे भारे पूर्ण जळाल्याने दुष्काळी परिस्थितीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...

No comments:
Post a Comment