Friday, 1 September 2017

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 74 रुपये वाढ, अनुदानित 8 रुपयांनी महाग


lpg_1453587395_1504257674
नवी दिल्ली ,दि.01– अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांना महाग झाले आहे. नवे दर आजपासून (शुक्रवार) लागू झाले आहे. केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात मार्चपर्यंत दर महिन्याला 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दर महिन्याला वाढ करुन सरकार मार्च 2018 पर्यंत घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याच्या विचारात आहे. पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेत म्हणाले होते, गेल्या वर्षी सरकारने तेल कंपन्यांना घरगुती वापराच्या (14.2KG) एलपीजी सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला 2 रुपयांनी वाढवण्याचे आदेश दिले होते, मात्र आता ते 2 रुपयांवरुन दर महिन्याला 4 रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...