नवी दिल्ली,01 (वृत्तसंस्था)- देशातील एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या सुमारे १४ हजार मालमत्तांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहे. या सर्व मालमत्तांच्या मालकांनी प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्यामुळे या मालमत्तांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी येथे दिली.
९ नोव्हेंबर २०१६ पासून सरकारने ५०० व एक हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्या. या नोटाबंदी मोहिमेच्या परिणामांचे विवेचन करणारा अहवाल प्राप्तिकर विभागाने प्रसिद्ध केला. नोटाबंदी मोहिमेनंतर ३१ जानेवारी २०१७ पासून ‘ऑपरेशन क्लिन मनी’ ही मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये प्रथमतः नोटाबंदीनंतर बँक खात्यांतून मोठ्या प्रमाणावर रोकड भरलेल्या व या रकमेशी उत्पन्नाचा मेळ न बसणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून १५ हजार ४९६ कोटी रुपये अघोषित संपत्ती उघड झाली, तर १३ हजार ९२० कोटी रुपये जप्त केले गेले.

No comments:
Post a Comment