नवी दिल्ली,1-केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शनिवार-रविवारी होत असलेल्या विस्तार आणि खांदेपालटात व्यापक फेरबदल होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पाच केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. यावेळी होणाऱ्या बदलात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचेवर रेल्वमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभू यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी गुरुवारी रात्री मंत्रीपदाचा राजीनामा दिला. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असून उत्तर प्रदेशातील तीन तर बिहारमधील दोन मंत्र्यांसह सहा-सात मंत्र्यांची उचलबांगडी केली जाण्याचे संकेत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मोठा खांदेपालट असेल. काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत स्थान देऊन तर काहींची राज्यपालपदी नियुक्ती करून मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा मार्ग प्रशस्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी, रविवारी दुपारी म्यानमार आणि चीनच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी तिरुपतीला जाणार असून ते शनिवारी परतणार आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी सकाळी होऊ शकेल, असे म्हटले जाते.

No comments:
Post a Comment