करडी/पालोरा,9 :- सिंचनाच्या अभावामुळे कोरडवाहू क्षेत्रात पिकांचे उत्पादन हे सारखे येत नसते. शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर सिंचनासाठी जलसंधारणाची कामे एकात्मिक पद्धतीने करावी लागतील. यासाठी सर्व विभागाच्या समन्वयासोबत शासनाला गावाचे विकास करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकार यांनी केले.
मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयु्नतालय महाराष्ट्र राज्य वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा जिल्हा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयु्नत विद्यमाने जलयु्नत शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत मोहाडी तालु्नयातील ८ गावातील गावपातळीवर शासकिय व अशासकिय प्रतिनिधीकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातील उद्घाटकिय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
बेसिक शाळा सभागृह करडी येथे १ ते ३ सप्टेंबर २०१६ या कालावधी करिता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक कृषी सहाय्यक, महिला प्रतिनिधी प्रगतशिल शेतकरी, कृषीमित्र, जलसेवक यांचे करिता जलयु्नत शिवार अभियानांतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराचे अध्यक्ष, अॅड. संजीव गजभिये, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर. एस. मांढरे, मंडळ कृषी अधिकारी आर.जी. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक एन. के. चांदेवार, भट्ट, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक जिल्हा पाणलोट विकास कक्ष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा चे नरेंद्र गणवीर उपस्थित होते.
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जलयु्नतशिवार अभियान कार्यक्रमाच्या उद्देश गाव निवडीचे निकष, विविध स्तरावरील गठीत समिती व त्यांची कार्य पाणलोट संकल्पना, प्रकार, सितांकन, नामांकन, सर्वेक्षण, नाल्यावरील उपचाराची माहिती बिगर वाहीती क्षेत्रावरील उपचाराची माहिती, उपचारासंदर्भात मार्गदर्शक सुचना, पाण्यांचे अंदाजपत्रक, लोकसहभागातून व श्रमदानातून नाला खोलीकरण व गाळ काढणे, समतल मशागत, मुल्य स्थांनी जलसंधारण, मनरेगा अंतर्गत करावयाची विविध कामे इत्यादी विषयांवर आर. एस. मांढरे, मिलींद गजभिये, लिलाधर पटले, एन. व्ही. गणविर, शैलेश हुमणे, किशोर पात्रीकार, व्ही. बी. वैद्य, एन. चांदेवार, इत्यांदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात ८ गावातील कृषी सहाय्यक ४, ग्रामसेवक ४, सरपंच ६, महिला प्रतिनीधी ४, प्रगतशिल शेतकरी, कृषी मित्र जलसेवक २४ असे एकूण ४२ प्रशिक्षाणार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी सागर बागडे, मिलींद गजभिये, आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment