देवरी,09- देवरी पोलिस ठाण्यात कार्यरत एका सहायक फौजदाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना अाज रात्री नऊच्या सुमारास आमगाव नजिक घडल्याचे वृत्त आहे.
मृतकाचे नाव मुन्ना अग्निहोत्री (वय 52), राहणार देवरी असे आहे.
सविस्तर असे की, देवरी पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असलेले मुन्ना अग्नीहोत्री हे आपल्या मोटार सायकलने उद्या साप्ताहिक रजा असल्याने आपल्या गावी गोंदियाकडे जात होते. ते आमगाव रेल्वे फाटकानजिक असलेल्या नाल्याजवळ पोचताच त्यांची बाइक रस्त्यावरील खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातास रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे. उल्लेखनीय म्हणजे रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे यापूर्वीसुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
No comments:
Post a Comment