पाटणा,03 (वृत्तसंस्था)-बिहारमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून, पक्षाच्या १४ आमदारांनी अनौपचारिक असा वेगळा गट स्थापन केला आहे. या गटाची सत्ताधारी संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश करण्याची तयारी सुरू असून, आमदारकी कायम राहण्यासाठी आणखी चार आमदार आपल्या गटात येण्याची वाट पाहण्यात येत आहे.
बिहारमध्ये सध्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या २७ इतकी असून, १४ आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. आमदारांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतीयांश आमदारांच्या गटाने बाहेर पडल्यास त्यांची आमदारकी कायम राहते. त्यानुसार, या गटामध्ये आमदारांची संख्या १८ इतकी आवश्यक आहे. सध्या १४ आमदारांचा गट असून, आणखी चार आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे आमदार फुटत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी व विधानसभेतील पक्षनेते सदानंद सिंह यांना दिल्लीत बोलावले होते.

No comments:
Post a Comment