नागपूर,03- रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याने सीआयएसएफ व पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. वेळीच सीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन केले आहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बिटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्याने तेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता. शनिवारी सायंकाळी एक युवक हातात रॉकेलची बाटली घेऊन संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. सीआयएसएफच्या जवानांनानी वेळीच हालचाल करून त्याला ताब्यात घेतले. ‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्याय मिळेल,या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो जवानांना सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. युवकाला ताब्यात घेतले. तशी नोंदही केली. संतोष याचे नातेवाइक नागपुरात राहतात. पोलिसांनी त्याचे नातेवाइक प्रभातकुमार यांना माहिती दिली. प्रभातकुमार तेथे पोहोचले. पोलिसांनी त्याला प्रभातकुमार यांच्या स्वाधीन केले. याबाबत विचारणा केली असता कोतवाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे म्हणाले, तो आत्मदहन करण्यासाठी आला नव्हता, अशी कोणतीही घटना येथे घडली नाही असे उत्तर त्यांनी दिले.

No comments:
Post a Comment