Sunday, 3 September 2017

नानांचा माफीनाम्याला नकार

नागपूर,03-  ‘शेतकऱ्यांबाबत व्यक्त केलेल्या भावनांवर अद्याप कुणीही विचारणा केलेली नाही पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विचारणा केल्यास कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या स्थितीवरील विदारक चित्र मांडू आणि सविस्तर विश्लेषण करू’, अशी रोखठोक भूमिका ‘पार्टी विथ डिफरन्स’ अर्थात भाजपचे खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली. मात्र, आपल्या वक्तव्याबाबत माफी मागण्यास त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडून खासदार नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सावध भूमिका घेतली. कुणी पटोलेंना स्पष्टीकरण देण्याबाबत तर कुणी छापून आलेल्या बातम्यांचे खंडन करण्याबाबत सूचविले. पटोले आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पटोले यांच्यावर कारवाई होणार, त्यांना दिल्लीतून तंबी मिळाली, अशा अफवांचे पेव फुटले. कुणी पटोलेंनी राजीनाम्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगितले. पटोले समर्थकांनी मात्र आपल्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या मनातील भावना बोलून दाखविल्याचे प्रशस्तीपत्र दिले.

पटोले यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली असताना, त्यांचे लोकसभेतील सहकारी नितीन गडकरी नागपुरात होते. त्यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी संध्याकाळी नागपूर मुक्कामी आले, त्यांची आणि पटोलेंची भेट झाली का हे देखील कळू शकले नाही. दिवसभर नॉट रिचेबल असलेले पटोले रात्री नागपुरात दाखल झाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...