Sunday, 3 September 2017

मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती


cab-news_2017099484


नवी दिल्ली, दि. 3 – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.  आज झालेल्या शपथविधीमध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली.  2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला.
शपथविधीच्या सुरुवातीला धर्मेंद्र प्रधान, पियूष गोयल, निर्मला सीतारमन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या चारही जणांनी मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता त्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. त्यानंतर शिवप्रताप शुक्ल, अश्निनीकुमार चौबे, डॉ. वीरेंद्र कुमार,  अनंत कुमार हेगडे,  राजकुमार सिंह,  हरदीपसिग पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, सत्यपाल सिंह, अल्फोन्स कन्ननथनम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यमंत्रिपदी निवड झालेले  शिव प्रताप शुक्ला उत्तरप्रदेशातील राज्यसभा खासदार आहेत. ते ग्रामविकास संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत.
– अश्विनी कुमार चौबे हे बिहारमधील बक्सर, लोकसभा खासदार आहेत. ते ऊर्जा आणि स्थायी समितीवर संसदीय समितीचे सदस्य आहेत.
– वीरेंद्र कुमार हे टिकमगढ, मध्य प्रदेशचे लोकसभा खासदार आहेत, त्यांनी एमए पी.एचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत.
– अनंतकुमार हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. ते परराष्ट्र व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत.
– माजी सनदी अधिकारी आरके सिंह हे बिहारमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते.
– हरिदिप सिंग पुरी 1 9 74 च्या तुकडीचे माजी आयएफएस अधिकारी आहेत, ते ब्राझिलमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचे वडिलही मुत्सद्दी होते.
-गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर लोकसभा खासदार, राजस्थान ते अर्थसंकल्प संसदीय स्थायी समितीचे सदस्य आणि फेलोशिप कमिटीचे अध्यक्ष आहेत.
– सत्यपाल सिंह 1980 च्या बँचचे, महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत, ते बागपत येथून लोकसभेत गेले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अजित सिंह यांचा पराभव केला होता.
-अल्फोन्स कन्ननथनम कोट्टयमचे असून प्रशासकीय सेवेत कार्यरत होते, त्यांना डिमॉलिशन मॅन नावाने ओळखले जाते.

मोदी कॅबीनेटमध्ये झालेल्या फेरबदलात चार मंत्र्यांचे प्रमोशन झाले. यामध्ये पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नकवी यांचा समावेश आहे. या चार मंत्र्यांपैकी तीन राज्यसभा खासदार आहेत. एकटे धर्मेंद्र प्रधान हे ओडिसाच्या देवगढ येथून लोकसभा सदस्य आहेत. का मिळाले प्रमोशन, हे आहे वैशिष्ट्य…
मुख्तार अब्बास नकवी, 59 : झारखंड मधून राज्यसभा खासदार.
का मिळाले प्रमोशन : कॅबीनेटमधील एकमेव मुस्लिम चेहरा.
विरोधी पक्षासोबत मिळून मिसळून काम करणे. राज्यसभेत पक्षाला मजबूत करण्यात मुख्य भूमिका पार पाडणे.
पीयूष गोयल, 53 : महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी त्यांच्यावर ऊर्जा राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कारभार होता.
का मिळाले प्रमोशन : गावागावांत वीज पोचविण्याची योजना प्रभावीपणे राबविली. भ्रष्टाचार असलेल्या कोळसा खात्यावर तत्काळ कृती करून  नियंत्रणात आणले. वीज उत्पादनात भरघोस वाढ केली.  हार्ड वर्किंग मंत्री मानले जातात.
धर्मेंद्र प्रधान, 48 : ओडिसाच्या देवगढमधून खासदार म्हणून निवडून आले. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्री
का मिळाले प्रमोशन : एलपीजीवरील सबसिडी स्वत:हून सोडण्यासाठी योजना अंमलात आणली. मोदींची उज्वला योजनेला नियोजबद्ध पद्धतीने चालविली. ऑईल मंत्रालयातील लॉबी संपुष्टात आणली. : लो प्रोफाईल, एनर्जेटिक आणि हार्ड वर्किंग
निर्मला सीतारमण, 58 : कर्नाटकमधून राज्यसभा सदस्य. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
का मिळाले प्रमोशन : ब्रिक्स समिट दरम्यान चीनमध्ये भारताची बाजू मांडली. चीनसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले.
 स्पष्ट वक्ते, पीएचडी आणि एमफिल, बीबीसीमध्ये कामाचा अनुभव, भाजपाच्या प्रवक्त्या आणि नॅशनल वूमन कमिशनच्या सदस्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...