नवी दिल्ली,दि.03(वृत्तसंस्था) – सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडत असल्याची घोषणा करताना ट्वीटरवर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच कॅबिनेट मंत्री बनलेले गोयल, नकवी, सीतारमन आणि धर्मेंद्र प्रधान यांचे अभिनंदन केले.मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खातेवाटप केले असून खातेवाटपानंतर ते चीनला रवाना झाले. सुरेश प्रभू यांची जागा पीयूष गोयल यांनी घेतली आहे. तर निर्मला सीतारमण या इंदिरा गांधींनतर दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री झाल्या आहेत. मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय देण्यात आले आहे. तर सुरेश प्रभू वाणिज्यमंत्री, स्मृती ईराणी माहिती-प्रसारणमंत्री तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कौशल्यविकास मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. डॉ. सत्यपाल सिंग यांच्याकडे मनुष्यबळ विकास, जलसंपदा, आणि गंगा-जलसंधारण खात्याचा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपावण्यात आला आहे. अल्फोन्स कन्नाथनम यांच्याकडे राज्य पर्यटन मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सुरेश प्रभू वाणिज्यमंत्री, स्मृती ईराणी माहिती-प्रसारणमंत्री तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय तसेच कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अश्विनीकुमार चौबे यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गजेंद्र सिंह शेखावत बनले नवे कृषिराज्यमंत्री झाले आहेत. तर राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रिडा राज्यमंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार आहे.नितिन गडकरी यांच्याकडे जलसंपदा व गंगाशुध्दीकरण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.हरदीप पुरी यांच्याकडे नागरी विकास राज्यमंत्रीपदाचा कार्यभार.उमा भारती यांच्याकडे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय,आर.के.सिहं उर्जा राज्यमंत्री,रामकृपाल यादव वाणिज्य राज्यमंत्री,स्मृती ईरानी टेक्सटाईल मंत्रालय सोपविण्यात आले आहे.
कैबिनेट मंत्री
1. धर्मेंद्र प्रधान- कौशल विकास व पेट्रोलियम मंत्रालय
2. पीयूष गोयल- रेल मंत्रालय
3. निर्मला सीतारमण- रक्षा मंत्रालय
4. मुख्तार अब्बास नकवी- अल्पसंख्यक मंत्रालय
5. सुरेश प्रभु- वाणिज्य मंत्रालय
6. स्मृति ईरानी- सूचना एवं प्रसारण मंत्रालय
7. नितिन गडकरी- जल संसाधन मंत्रालय
8. उमा भारती- पेयजल एवं स्वच्छता मंत्रालय
राज्यमंत्री
1. शिव प्रताप शुक्ला – वित्त राज्यमंत्री
2. अश्विनी कुमार चौबे- स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्यमंत्री
3. वीरेंद्र कुमार- महिला एवं बाल विकास राज्यमंत्री
4. अनंत कुमार हेगड़े- कौशल विकास राज्यमंत्री
5. राजकुमार सिंह- ऊर्जा एवं नवीकरणीय एवं अक्षय ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
6. हरदीप सिंह पुरी- आवास एवं शहरी मामलों का मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
7. गजेंद्र सिंह शेखावत- कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय
8. सत्यपाल सिंह-एचआरडी मंत्रालय
9. अल्फ़ोंस कन्ननथनम- पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
No comments:
Post a Comment