कुरखेडा, दि.९: तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी चारचाकी प्रवासी वाहन उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडलीया अपघातात दुचाकीवरील तीन, तर चारचाकीतून प्रवास करणारे दोन, असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये कोसी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अक्षय बाळापुरे(३६), जीवन बोगा(५०)रा.कोसी, फुलचंद बोगा(३२)रा. पळसगाव, काशीराम वट्टी(५५) रा.मोहगाव व गुलाब भिवनकर (५७) रा. तळोधी-बाळापूर यांचा समावेश आहे.या घटनेत तीन जण मोटारसायकलने सोनसरीवरून कोसीला जात होते. दरम्यान मोहगाववरून कुरखेड्याकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनाच्या चालकाचे दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात संतुलन बिघडल्याने चारचाकी वाहन दोन-तिनदा उलटले. घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना उपचारासाठी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment