Friday, 8 September 2017

लाखनी येथे दिग्विजयदिन येत्या सोमवारी

लाखनी,9- स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित विवेकानंद वाचनलयाच्या वतीने येत्या सोमवारी (ता.11) दिग्विजय दिन व्याख्यानाचे आयोजन  दुपारी 3 वाजे करण्यात आले आहे.
स्थानिक  विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या सभागृहातदिग्विजय दिनानिमित्त 'आजच्या समाज जीवनातील विवेकानंदाचे महत्व' या विषयावर व्याख्यानमालेचे  आयोजन सोमवारी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे  विदर्भ प्रांत संघटन मंत्री अरुण नेटके उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे  सदस्य मधुकर लाड हे राहणार आहेत.

या व्याख्यानमालेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह अजिक्य भांडारकर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...