Friday, 8 September 2017

वकिलाच्या पत्नीला कारावास


नागपूर,08- एका २२ वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात एका ३८ वर्षीय महिलेला न्यायालयाने सात वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रजनी प्रवीण लांजेवार (३८,रा. वर्मा ले-आऊट) असे महिलेचे नाव असून ती एका वकिलाची पत्नी आहे. रजनीवर पीयूष अशोक गडेकर याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप लावण्यात आला होता.
पीयूषच्या आत्महत्येची घटना २४ जानेवारी २०१२ रोजी उघडकीस आली होती. पीयूषचे वडील अशोक यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय होता. आरोपी रजनीचे पती प्रवीण हे वकील असून नोटरीसुद्धा आहेत. अशोक यांचा प्रवीण यांच्याशी नेहमी संपर्क येत असे. पीयूषसुद्धा आपल्या वडीलांना त्यांच्या व्यवसायात मदत करीत असे. यातून गडेकर आणि लांजेवार परिवाराचे चांगले संबंध निर्माण झाले. पीयूष आणि रजनी यांची ओळख झाली. वयात अंतर असूनसुद्धा त्यांच्याच चांगली मैत्री प्रस्थापित झाली होती. ते दोघे अनेकदा कुटुंबियांसोबत तसेच कधी कधी एकटेचसुद्धा फिरायला जात असत. या मैत्रीचा फायदा घेत रजनीने पीयूषकडून दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम उधार घेतली होती.

काही काळानंतर पीयूषने ही रक्कम परत करण्याची मागणी तिच्याकडे केली. परंतु तिने उधारी परतखेरीज अधिक पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार करून तुझे करिअर उद्ध्वस्त करेन, अशी धमकी दिली, असे आरोप रजनीवर लावण्यात आले होते. या सगळ्या बाबींमुळे पीयूषने उद्गिग्न मनस्थितीत आत्महत्येचा निर्णय घेतला. पीयूषने रजनी हिच्याच घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला. दरम्यान पीयूषचे वडील अशोक यांनीसुद्धा पोलिसात तक्रार देऊन आपल्या मुलाच्या आत्महत्येस रजनीच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. अॅड. राजेंद्र मेंढे यांनी सरकारची तर अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी आरोपीची बाजू मांडली. न्यायाधीश डी. एन. बनकर यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आरोपीला दोषी ठरवित तिला सात वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...