पुणे,08-सोवळे मोडले म्हणून महिलेच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.
याबाबत डॉ. मेधा विनायक खोले (वय ५० रा. शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार धायरी येथील महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. खोले या हवामानशास्त्र विभागात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खोले यांच्या घरी दरवर्षी गौरी, गणपती बसतात. घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना सोवळ्यातील स्वयंपाक करणारी महिला पाहिजे होती. मे २०१६ मध्ये कामाच्या शोधात निर्मला कुलकर्णी नावाची महिला त्यांच्या घरी आली. मी सोवळ्यात स्वयंपाक करते असे तिने सांगितले. तिच्या सांगण्यावरून खोले यांनी घरी जाऊन चौकशी केली. त्यानंतर लगेचच निर्मला यांना स्वयंपाकासाठी बोलावून घेतले.

No comments:
Post a Comment