Friday, 8 September 2017

सच्चा डेऱ्यातील रहस्य बाहेर येण्यास सुरवात




 सिरसा,08- हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या बाबा राम रहीमच्या आश्रमातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्यास सुरवात झाली आहे. बाबा राम रहीम याच्या आश्रमातील दोन खोल्या भरून रोख रक्कम आढळली  आहे. या खोल्या सील करण्यात आल्या असून डेरा आश्रमातील गुफेतून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुमारे ८०० एकर जमिनीवर असलेल्या डेरा आश्रमात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये टीव्ही लाइव्ह प्रसारणासाठीची ओबी व्हॅन, गाडीवर नंबर नसलेली लेक्सस कार, कोणत्याही कंपनीचा उल्लेख नसलेली औषधे सापडली आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळली असून हार्ड डिस्क, मोबाइल सापडले आहेत. त्याशिवाय बाबाचे स्वत: चे चलन प्लास्टीकचे चलन आढळले असून त्याचा वापर आश्रमातंर्गतील व्यवहारांसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे. आतापर्यंत ५ खोल्या सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच, निमलष्करी दलाची ४१ पथकं, लष्कराच्या ४ तुकड्या, पोलिसांचा ताफा, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉड आज सकाळी या डेऱ्यात शिरलेत. जेसीबी मशीन आणि दहा लोहारही ते सोबत घेऊन गेलेत. त्यामुळे या ७०० एकर जागेवरील आश्रमात सकाळपासूनच पाडकाम, खोदकाम सुरू झालं आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...