Saturday, 9 September 2017

रामटेकच्या भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर, दि. 8 – निवेदन देण्यास गेलेल्या महिलांना असभ्य वागणूक देत अरेरावी करणे तसेच जीवघेणा प्रयत्न करणे रामटेकच्या भाजपा आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना महागात पडले. त्यांच्याविरोधात महिलांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आमदाराविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत रामटेक पोलीस ठाण्यात संगीता वांढरे, रा. कांद्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आशा लोखंडे, लता सोनेकर, उषा कामडे, ललिता दोंदलकर, सयनाला शेख, अम्माजी जाधव यांच्यासह २० ते २५ महिला आ. डी. एम. रेड्डी यांच्या मनसर येथील कार्यालयात शुक्रवारी सकाळी गेल्या होत्या. मायक्रोफायनान्स कंपनी महिलांना त्रास देत आहे, याकडे तुम्ही लक्ष घाला, कारवाई करा या मागणीचे निवेदन घेऊन आपबिती सांगितली. दरम्यान निवेदन देण्याच्या तयारीत महिला असताना निवेदन घेण्यास नकार दिला. महिलांना असभ्य वागणूक देत संगीता वांढरे यांच्या अंगावर वाहन आणण्याचा प्रयत्न केला. त्यात संगीता यांच्या पायाला लागले, असे वांढरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, आमदारांनी रामटेक पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. तेथे उपस्थित महिलांना पोलिसांनी गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले. लोकप्रतिनिधी आमचे ऐकत नाही, असभ्य वागणूक दिली, जीव घेण्याचा प्रयत्न केला असेही तक्रारी नमूद केले.
रामटेक पोलिसांनी सुरुवातीला चालढकल करीत महिलांची तक्रार घेण्याचे टाळले. मात्र प्रहार संघटनेचे रमेश कारामोरे, विनय चौधरी यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देताच महिलांची तक्रार घेण्यात आली. त्या तक्रारीवरून आमदार रेड्डींविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...