Saturday, 9 September 2017

हागणदारी मुक्त अभियानात नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया मागे

मुंबईदि.9 : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांच्या कामाचा आढावा मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी  घेतला. राज्यातील जवळपास 95 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था हागणदारीमुक्त झाल्या असून उर्वरित 5 टक्के येत्या महिन्याभरात हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करणे शक्य होईल,असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी नागपूरचंद्रपूरगडचिरोलीगोंदियानाशिक,अहमदनगरबीड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून या जिल्ह्यातील महापालिकानगरपरिषद आणि आणि नगरपंचायतीच्या हागणदारमुक्तीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी हागणदारीमुक्तीसाठी शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. नागपूरचंद्रपूर,गडचिरोलीगोंदियानाशिकअहमदनगरबीड या 7 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शौचालय बांधकामासाठी गती देण्याची गरज असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामांवर भर देऊन सामूहिक शौचालये बांधल्यानंतर त्यांच्या स्वच्छतेची आणि देखभालीची दक्षता घ्यावी असेनिर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले. 2 ऑक्टोबर 2017 रोजी राज्यातील सर्व शहरे हागणदारी मुक्तीचा संकल्प करण्यात आला आहे,त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेअसे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...