Saturday, 9 September 2017

वैद्यकिय शिक्षणमंत्र्यासमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे

nitin-gadkari-580x395


नागपूर,दि.09- आरोग्य विभागात मशिन्स असले तर ऑपरेटर नाही आणि ऑपरेटर असले तर मेंटेनन्स नाही, अशी परिस्थिती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्याच्या आरोग्य विभागाचे वास्तव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मांडले.
 राज्यातील आणि देशातील पहिल्या शासकीय स्तरावर स्टेम सेल नोंदणीची मोहीम आणि प्रकल्प नागपुरात सुरु झाला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.
राज्यात नवनवीन आरोग्यासंदर्भात सोयी आणल्या जातात. मात्र एकतर मशिन्स येत नाहीत. मशिन्स आलेत तर ऑपरेटर येत नाहीत. ऑपरेटर आले तर मेंटेनन्स नाही आणि मेंटेनन्स केले तर पैसे नाहीत, अशी अवस्था आहे, असे सांगत गडकरींनी राज्याच्या आरोग्य विभागाची परिस्थिती त्या विभागाच्या मंत्र्यासमोरच सांगितली. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. केंद्राकडून काय हवी ती मदत घ्या आणि सगळे व्यवस्थित ठेवा, असेही गडकरींनी गिरीश महाजनांना प्रत्यक्ष सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...