Sunday, 3 September 2017

पालकमंत्र्याच्या मतदारसंघात पहाटेपासून आनलाईन कर्जमाफीसाठी गर्दी

21151683_874939572659832_5770057161290399427_n

गोंदिया,दि.03 – राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार,कर्जमाफीसाठी काय करावे लागणार यावर सरकारने वेळोवेळी आपले धोरण बदलविले.त्या धोरणाचा फटका चांगलाच शेतकर्यांना बसला आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील 68 हजार 290 शेतकर्याना मिळणार असे सरकारचे म्हणने असले तरी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रकियेमुळे यातील किती शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील याबद्दल शंकाच आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रावर सुध्दा रांग लावण्याची वेळ आली असून लोक पहाटेपासूनच सेतू केद्राकडे जाऊ लागले आहेत.राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व गोंदियाचे पालकमंत्री असलेले राजकुमार बडोले यांच्या मतदारसंघातील सौदंड येथे आज शनिवारला पहाटे  पाच वाजेपासूनच काही महिला पुुरुष शेतकर्यांनी हजेरी लावली तर  प्रीतम गोबाडे यांच्या नुसार रात्री दोन वाजेपासूनच सेतू केंद्रात आनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...