Sunday, 3 September 2017

वडिलाने दुचाकी न दिल्याने मुलाची आत्महत्या

सडक अर्जुनी,दि.03- डुग्गीपार पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या राका येथील एका युवकांने वडिलांनी दुचाकी वाहन खरेदी करुन न दिल्याचा राग मनात घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृत मुलाचे नाव कुणाल मंगेश डोये असे आहे.कुणाल हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.तो सायकलने या जा करायचा.सायकल नादुरुस्त झाल्याने वडिलांना त्याने दुचाकी खरेदी करुन मागितली,त्यावर वडिलांनी दिवाळीमध्ये खरेदी करु असे सांगितले.या छोट्याशा कारणावरुन कुणालने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...