गोंदिया, 08- शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूलबसला एका गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एका शिक्षिकेसह पाच विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9च्या सुमारास घडली. जखमीमधील एकाची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत असून जखमींवर गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर असे की, स्थानिक प्रोग्रेसीव्ह पब्लीक स्कूलची बस सकाळी नऊच्या सुमाराल विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत्या दिशेने निघाली होती. दरम्यान छोटा गोंदिया परिसरातील नवीन रिंगरोडवरील राजाभोज चौकात क्रास दिशेने येणाऱ्या एका गिट्टी भरलेल्या ट्रक ने या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रोग्रेसिव्ह शाळेच्या 5 विद्यार्थ्यांसह एक शिक्षीका जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती होताच गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हे स्वतः घटनास्थळावर दाखल आले. यावेळी गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते आणि डॉ. दीपाली खन्ना, गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार दिनेश शुक्ला, शहर ठाणेदार मनोहर दाभाडे,नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि संस्थाचालक नीरज कटकवार हे घटनास्थळावरील परिस्थितीवर लक्ष देऊन होते.
No comments:
Post a Comment