गोंदिया,दि.07-ः गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. यापूर्वी या भागासाठी सरकारकडून भाड्याने हेलिकॉप्टर वापरण्यात येत असल्याने त्याचा मोठा वित्तीय भार सहन करावा लागत होता. यासोबतच शासनाच्या वापरासाठीही दुसरे नवीन हेलिकॉप्टर घेण्यात येणार आहे. वास्तविक चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा गोंदिया हा जिल्हा अधिक नक्षलग्रस्त असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत गोंदियाला वगळण्यात आल्याने गोंदिया हा जिल्हा नक्षलग्रस्त नाही का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.सोबतच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गोंदियातील नक्षल घडामोडीची माहीती नव्हती का की ते मंत्रीमंडळात हा निर्णय होत असताना काही सांगू शकले नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासह हवाई वैद्यकीय ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवीन हेलिकॉप्टर घेण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या या प्रयोजनासाठी भाड्याने हेलिकॉप्टर वापरण्यात येते. त्याचा शासकीय तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेता नवीन हेलिकॉप्टरची खरेदी फायदेशीर ठरत
असल्याने हा निर्णय घेण्यात आला.याशिवाय राज्य शासनाच्या मालकीचे हेलिकॉप्टर सिर्कोस्की एस 76 सी ++ व्हीटी-सीएमएम याचा अलिकडेच अपघात झाला. त्याचा पुनर्वापर शक्य नसल्याने त्याच्याऐवजी नवीन हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या अपघात विम्याची रक्कम मिळाल्यानंतर त्यातून हे नवीन
हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment