Monday, 4 September 2017

सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकèयांनी केले उपोषण

uposhan wardha - 1

वर्धा,दि.०४-महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली निकषांची चाळणी लावून शेतकèयांसोबत पोरखेळ सुरु केला असून ‘शेतकèयांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यायची आहे‘ अशा आशयाची वेळोवेळी वक्तव्ये करणाèया मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीच्या नावाखाली शेतकèयांची घोर फसवणूकच केलेली आहे. त्या निषेधार्थ ३ सप्टेंबरला युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जन्मदिवशी वर्धा येथील शास्त्री पुतळ्याजवळील बच्छराज भवन मध्ये सामुहिक उपोषण करण्यात आले.
देशातील शेतकèयांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही असे शरद जोशी नेहमी म्हणायचे पण क्रूर नियतीने अवेळीच डाव साधला आणि त्यांचे स्वप्न अधुरे राहून गेले. युगात्मा शरद जोशींच्या ८२ व्या जन्मदिवसाचे निमित्त साधून राज्यातील शेतकèयांना सरसकट कर्जमुक्त करून सर्व शेतकèयांचा सातबारा कोरा करणारी कर्जमुक्ती जाहीर करण्यास राज्यसरकारला भाग पाडण्यासाठी एक दिवसाचे उपोषण करून शरद जोशींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शेतकèयांवरील सर्व कर्ज अनैतिकच असल्याने विनाअट, विनानिकष सातबारा पूर्णपणे कोरा करा, वीज बिलातून शेतकèयांची पूर्णतः मुक्तता करा, शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी निर्यात शुल्क वाढवणे, निर्यातीवर बंदी अथवा निर्बंध लादणे, चढ्या दराने परदेशातून शेतमालाची आयात करणे, आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालणे, व्यापारी साठ्यांवर मर्यादा घालणे, विक्री किमतीवर मर्यादा घालणे आदी उपाय कायमस्वरूपी बंद करा, शेतीला जाचक ठरणारे कायदे रद्द करा, शरद जोशी प्रणीत मार्शल प्लान (भारत उत्थान कार्यक्रम) लागू करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे सामुहिक उपोषण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...