अमरावती, दि. 4 – अघोरी विद्येचा प्रयोग करून उपचार करण्याच्या नावावर एका आजारी महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूडनजीकच्या झटामझिरी येथे घडली. महिलेचा आजार बरा न होता वाढतच गेल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरूड पोलिसांत तक्रार करण्यात आली असून आरोपी मांत्रिक प्रभू गणपत पाटील (रा.मोटागाव, झटामझिरी) हा पसार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आदिवासीबहुल झटामझिरी येथील ६५ वर्षीय पीडिता मागील दोन वर्षांपासून विविध आजारांनी ग्रस्त आहे. आजारावर उपचार घेण्यासाठी १० महिन्यांपूर्वी ती गावातीलच मांत्रिक प्रभू पाटील यांच्याकडे गेली. मांत्रिक तिला घरी बोलावून पूजा, लिंबू, अंगारा व जादूटोणा करून काही तरी खाण्यास देत होता. यामुळे कधी तिचे दुखणे कमी, तर कधी वाढत होत होते.

No comments:
Post a Comment