गोंदिया,४- जुनी पेंशन हक्क संघटनेच्या गोंदिया येथील तालुका कार्यकारिणीची मुदत संपल्याने काल रविवारी (ता.३) नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
स्थानिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या कार्यालयात आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके हे होते. नव्या कार्यकारिणीमध्ये सुनील राठोड यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. इतर सदस्यांमध्ये सचिवपदी शालिक कठाणे, कार्याध्यक्षपदी सुनील चौरागडे, उपाध्यक्षपदी अमोल पाटणकर, कोशाध्यक्षपदी संजय उके, प्रसिद्धीप्रमुखपदी स्वप्नील ढोणे, महिला प्रतिनिधी म्हणून वर्षा श्रीभद्रे, संपर्क प्रमुख म्हणून के.जे. राठोड, तालुका संघटकपदी राजेश बिसेन, सहसचिवपदी सतीश नागपुरे, सदस्य म्हणून चंदू नागदेवे, अंशूल हिरकणे, शैलेश बारेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवकार्यकारिणीतील पदाधिकाèयांचे आशिष रामटेके यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment