वणी,दि.28 : शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत विद्यार्थिनी व तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.28) घडली. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, विविध चर्चेला उधाण आले आहे.शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास असलेली दिव्या जाधव ही येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात इयत्ता अकरावीत विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. आज सकाळी नऊला तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळाली.दुसरी घटना कोंडनावाडी येथे घडली. रोहित दुपारे (वय18) या तरुणाने त्याच परिसरात असलेल्या मंदिराजवळील निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी मृत दिव्याला तो पाहून गेला. त्यानंतर काही वेळातच त्यानेही आत्महत्येचे पाऊल उचलले. या दोन्ही आत्महत्येमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
Sunday, 29 July 2018
मनोहरभाई पटेल महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन

या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण झिंगरे हे होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेश चिखलखुंदे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अर्थशास्त्र विभागप्रमुख वर्षा गंगणे ह्या उपस्थित होत्या. या परिसंवादामध्ये वक्त्यांनी लोकसंख्या वाढीची कारणे, त्यांचे परिणाम, शैक्षणिक विकासस बेरोजगारी, लोकशाही वाढीचे टप्पे आणि संक्रमण या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज शेंद्रे यांनी केले. संचलन व आभार वनिता दहिकर यांनी मानले. यावेळी महालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिपरखारी येथे पोलिस विभागातर्फे आरोग्य शिबीर


.
या शिबीराला यशस्वी करण्यासाठी चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर यांनी सहकार्य केले. शिबीरात लाभार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या 10 ऑक्टोबर 1992 मध्ये नक्षली हल्ल्यात पिपरखारीचे पोलिसपाटील दिपक मडावी यांचे वडील केशवराव दामाजी मडावी यांचा बळी गेला होता. त्यांच्या स्मारकाची निर्मिती चिचगड पोलिसांच्या वतीने करण्यात आला,
दरम्यान, गेल्या 10 ऑक्टोबर 1992 मध्ये नक्षली हल्ल्यात पिपरखारीचे पोलिसपाटील दिपक मडावी यांचे वडील केशवराव दामाजी मडावी यांचा बळी गेला होता. त्यांच्या स्मारकाची निर्मिती चिचगड पोलिसांच्या वतीने करण्यात आला,
Saturday, 28 July 2018
सनसाईन पब्लिक स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात
देवरी,दि.28- स्थानिक सनसाईन पब्लिक स्कूल येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख दिलीप दुरुगकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या भारती दुरूगकर, मयुरी मॅडम, प्रधानाध्यापक बी आर मुनगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका सीमा चौधरी यांनी केले. उपस्थितांचे आभार सोमेश्वरी भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगिता कोसरकर, ज्योत्सना शेंडे, आशा चौधरी , भूमेश्वरी ठाकरे आदींनी सहकार्य केले.
Friday, 27 July 2018
खडकी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन
नक्षल दमन सप्ताह अंतर्गत देवरी पोलिसांचा उपक्रम
देवरी, दि.27- नक्षल दमन सप्ताह अंतर्गत देवरी पोलिसांच्या वतीने नजीकच्या खडकी येथे एक दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन गेल्या गुरूवारी (दि.25) करण्यात आले होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आणि गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली खडकीच्या जिल्हा परिषद शाळेत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 253 रुग्णांची तपासणी करून गरजूंना औषधींचे वितरण करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी चमूत डॉ. आनंद चांदेवार, डॉ. गुरू कापगते, डॉ. सुरसावंत, डॉ. लक्ष्मीकांच चांदेवार यांचेसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या शिबिराला देवरीचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि अप्पर पोलिस अधीक्षक संदीप आ आटोळे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
या शिबीराला यशस्वी करण्यासाठी देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव आणि त्यांचे सहकारी आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.
छाबडाजी ने पेश की अनूठी मिसाल “अपनी गाड़ी अपना साइड “
बालाघाट- यहा कें सरेखा रेलवे क्रॉसिंग के पास लगभग 75 से 80 वर्ष के एक बुजुर्ग व्यक्तीने हाथ में बैनर लिए “अपनी गाड़ी अपना साइड” बंद रेलवे क्रॉसिंग पर खड़े लोगों को यातायात के नियम समजाने की कोशिष ने युवाओ के सामने नई मिशाल कायम की है ।जो काम नगर के युवाओं को करना चाहिए। वही प्रेरणा देने का काम हमारे नगर के वरिष्ठतम बुजुर्ग कर रहे हैं जो कहीं ना कहीं युवाओं के लिए सोचने का विषय है। यह देखा गया है कि सरेखा रेलवे क्रॉसिंग, भटेरा रेलवे क्रॉसिंग, बैहर रेलवे क्रॉसिंग इन जगहों पर जब ट्रेन निकलती है। तो गेट बंद हो जाने के कारण लंबा जाम लग जाता है ।ऐसी स्थिति में लोग अपने साइड को छोड़कर जल्दबाजी में दूसरे तरफ से निकलने की कोशिश करते हैं ।ऐसी स्थिति में सामने से आने वाले लोगों को बहुत दिक्कत का सामना करना पड़ता है ।और एक पल ऐसा आता है कि रेलवे क्रॉसिंग पर आमने सामने से आए हुए लोगों के कारण गाड़ियों का लंबा जाम लग जाता है। जिसके कारण जनता को भारी परेशानी का सामना करना पड़ता है । जिसके कारण नित्य काम में जाने वाले लोगों को एवं स्कूल जाने वाले बच्चों को काफी परेशानी का सामना करना पड़ता है ।आज बालाघाट के वरिष्ठतम बुजुर्गसुरजीत सिंह छाबड़ा है उन्होंने एक बहुत ही अनूठी मिसाल पेश करी है “अपनी गाड़ी अपना साइड “नाम के बैनर के साथ अकेले ही रेलवे क्रॉसिंग पर वहां खड़े लोगों को समझाइश देते हुए दिखाई पड़े जो अपने आप में लोगों के बीच में कोतूहल का विषय बना रहा।
Thursday, 26 July 2018
महिलांना संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे
गोंदिया,दि.26 : दैनंदिन जीवन तसेच कारभारात महिलांसोबत विविध घटना घडतात. मात्र महिलांना कायद्याची जाणीव नसल्याने त्या काहीच करू शकत नाही. याकरिता, महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महिला राज्यसत्ता आंदोलन यांच्या संयुक्तवतीने पंचायत समिती सभागृहात आयोजीत महिला सरपंच व सदस्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
उद्घाटन जिल्हा परिषद बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, खंडविकास अधिकारी डॉ. पानझाडे, विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य उपस्थित होत्या.
कार्यशाळेत रामटेके यांनी, राज्य महिला आयोगाची भूमिका मांडताना कार्यशाळेचा उद्देश व महिला कारभारणी यांना गावविकास करत असतांना जातात विविध घटना घडतात. तेव्हा कायद्याचा वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. पानझाडे यांनी, राज्य महिला आयोग महिला अत्याचारावर छान काम करत असल्याचे सांगीतले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी व पंचात समिती सभापती हरिणखेडे यांनीही महिलांना मागदर्शन केले.
प्रास्ताविक रत्नामाला वैद्य यांनी मांडले. संचालन सावित्री अॅकेडमीचे महेंद्र मेश्राम यांनी केले. आभार शर्मिला चिमनकर व साधु तिरपुडे यांनी मानले. कार्यशाळेत मोठ्या संख्येत महिला सरपंच व सदस्य उपस्थित होत्या.
बाजार समितीच्या जागेचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करणार
सडक अजुर्नी,दि.26ः-कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अजुर्नी व उपबाजार सौंदडच्या इमारतीकरीता शासकीय जमिनीचा प्रश्न गेल्या पाच वषार्पासून प्रलंबित आहे. जमिनीचा हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावी, अन्यथा २ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बाजार समिती संचालकांनी निवेदनातून जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देताना, बाजार समिती सभापती डॉ. अविनाश काशीवार, उपसभापती आनंद अग्रवाल, संचालक डॉ. रूकीराम वाढई, वसंत गहाणे, रूपविलास कुरसुंगे, हिरालाल चव्हाण, मिताराम देशमुख, दिलीप गभने, डॉ. भुमेश्वर पटले, शोभा परशुरामकर, छाया मरस्कोल्हे आदी संचालक उपस्थित होते
निवेदनानुसार, सडक अजुर्नी येथील कृषी उत्पन्न मुख्य बाजार समिती व उपबाजार सौंदडची स्थापना ५ नोव्हेंबर २0१२ रोजी झाली असून सडक अजुर्नी बाजार समितीचे शासकीय जमीन प्रकरण २६ जानेवारी २0१३ व सौंदड उपबाजाराचे जमीन प्रकरण २३ मार्च २0१३ पासून सुरू आहे. विशेष म्हणजे, दोन्ही बाजार समितीच्या इमारतीसाठी जमीन खरेदीसाठी शासकीय दराप्रमाणे रक्कम अदा करण्यास बाजार समिती तयार असताना सुध्दा आजपयर्ंत समितीला शासकीय जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज भाड्याच्या इमारतीमधून सुरू असून मार्केट यार्ड, गोदाम, शेड आदीसह भौतिक सुविधांचा असून असून समिती शेतकर्यांच्या हिताच्या सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरत आहे.
सडक अजुर्नी बाजार समितीसाठी गट क्र. २१९ आराजी ३.८२ हे.आर. पैकी १.२0 हेआर जमीन व उपबाजार सौंदडसाठी गट क्र. ११३५ आराजी ५४.0२ हेआर पैकी 0.८0 हेआर शासकीय जमीन प्राप्तीसाठी गेल्या पाच वषार्पासून संबंधित सर्व कार्यालयांला पाठपुरावा व त्रृत्यांची पूर्तता करण्यात आली आहे. परंतु, समितीच्या शासकीय जमीन मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपयर्ंत समितीचे जमीन प्रकरण निकाली काढण्यात यावे, अन्यथा २ ऑगस्टपासून समितीचे सर्व संचालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Wednesday, 25 July 2018
कत्तलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका
सेंदूरवाफा येथील घटना
साकोली,दि.25 : ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे जाणारा एक ट्रक पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. यात ३९ जनावरांची सुटका करून गौशाळेत सुखरुप रवानगी केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे.
रात्रीदरम्यान पोलीस गस्तीवर असताना टोलनाक्याजवळ पोलीस वाहन दिसताच ट्रक चालकाने ट्रकचा वेग वाढविला. पोलिसांना याबाबत शंका येताच ट्रकचा पाठलाग केला. सदर ट्रक सेंदूरवाफा गावाजवळ अडविला. त्यात ३९ जनावरे कोंबून असलेली दिसली. ट्रक क्रमांक एम.एच. ३५ के ५१८६ ला ताब्यात घेून जनावरे गौशाळा खैरी येथे सुखरुप रवानगी केली. प्राणी क्रुरतेने वागविणे प्रतिबंधक कायद्यान्वये ट्रक चालक फिरोज नईम खान पठाण (३२), साहिल छोटे शेख (२६) दोन्ही राहणार सडक अर्जुनी व किशोर माधोराव झोडे (३९) रा.केसलवाडा जि.गोंदिया यांना अटक केली. पोलीस नायक देवेंद्र खडसे, पोलीस शिपाई पटले यांनी ही कारवाई केली.
पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांची जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त
विखे पाटलांचा आरोप
मुंबई,दि.25 - मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
या आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघाती आरोप केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा प्रकार घडला नव्हता. पण मागील ६० वर्षात घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने ४ वर्षात करून दाखवले आहे. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जातीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अत्यंत अश्लाघ्य असल्याचेही ते म्हणाले. गेल्या ४ वर्षात धर्माच्या आधारे देशभक्ती तपासली जात होती. आता जातीच्या आधारे कर्तव्यपरायणता तपासली जाते आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, या प्रकाराबद्दल सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राला ज्वालामुखीच्या तोंडावर उभा करण्यासाठी भाजप- शिवसेनेचे राज्य सरकार कारणीभूत आहे. एकीकडे मागासवर्ग आयोग नेमण्यापासून न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत भक्कमपणे भूमिका मांडण्यात प्रत्येक ठिकाणी सरकारने अक्षम्य दिरंगाई केली तर दुसरीकडे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मराठा समाजाचा अवमान करणारी आणि मराठा समाजाला शांततेचा मार्ग सोडण्यास उद्युक्त करणारी विधाने केली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर आजच्या परिस्थितीसाठी पूर्णतः केवळ मुख्यमंत्री जबाबदार असून, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.
शिवसेनेची भूमिका दुटप्पी
मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील खुर्च्या उबवताना दिसतात. शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर 'बोलाचाच भात, बोलाचीच कढी' पुरे करून त्यांनी आजच्या आज सरकारबाहेर पडण्याची घोषणा करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
सकल मराठा समाजासोबत चर्चेस तयार- देेवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.25 - मराठा आरक्षणावरून राज्यात हिंसक पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. सकल मराठा समाजासोबत चर्चेस आपण तयार असून आंदोलकांनी हिंसाचार करण्यापेक्षा हिंसाचार करण्यापेक्षा चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले. यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनात म्हटले आहे.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतू मा. उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
यासोबतच छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून सुमारे 602 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शैक्षणिक शुल्काचा परतावा राज्य सरकार देत आहे. सुमारे 2 लाखावर विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यापैकी 2 वसतीगृहांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण उद्योजकांना व्याज परतावा तत्वावर सुलभ कर्ज देणारी योजना सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खदायी आहेत. शासकीय योजनांसंदर्भात किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्येही- संजय राऊत
मुंबई,दि.25 - मराठा आरक्षणावरून आज मुंबईत पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचा या बंदला पाठिंबा होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप म्हणजे पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील एकंदर चित्र पाहता राजकीय नेतृत्वाचं हे अपयश आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर भाजपमध्येही सुरू असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळलंय. तसंच कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्यात. परंतु मुंबई बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी आंदोलकांनी दगड उचलल्याचं आणि रेल्वे अडवल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
औरंगाबाद,दि.25 - मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाल्याने कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला इशारा दिला होता. बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश न निघाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशी, असे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ.जाधव समर्थकांसह दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनास बसले होते. आमदार पदाचा राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. काकासाहेब शिंदे यांच्या कुटूंबियांना वैयक्तिक पाच लाखांची मदत केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. तसेच स्वत: भेट घेऊन देखील त्यांच्याकडे राजीनाम्याची प्रत देण्यात येणार आहे.
ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा
कोरची,दि.25ः- २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण ६ वरून १९ टक्के करण्याचा निर्धार चामोर्शी येथे झालेल्या जाहीर सभेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी यांनी केला होता. मात्र, चार वर्षे लोटूनही अजूनपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत सत्ता पक्षाचे एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. त्यामुळे शासनाच्या मेगा भरती अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करून मेगा भरती घेण्यात यावी, अशी मागणी कोरची तालुका ओबीसी संघटनेने तहसीलदांरामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गात सुमारे ५00 च्या वर जातीचा समावेश आहे. त्यांच्यासाठी असलेले सहा टक्के आरक्षण त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अतिशय नगण्य आहे. ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारे व त्यांना मागासलेपणाच्या गर्तेत लोटणारे आहे. सध्या होणार्या भरती प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गाच्या वाट्याला एकही जागा येत नसल्याने ओबीसी प्रवर्गातील लाखोंच्या संख्येत सुशिक्षित बेरोजगार तरुण बेरोजगार आहेत.
ओबीसींनी स्वत: होणार्या अन्यायाच्या विरोधात अतिशय संयमपणे आपली भूमिका शासनापुढे ठेवली आहे. मात्र न्यायोचित मार्गाने त्यांचे प्रश्न सुटत नसतील तर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी सामूहिक आत्मदहनाचा सोहळा आयोजित करून आपले लक्ष या प्रश्नाकडे वेधावे का याबाबत आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. सदर मागणी १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कोरची तालुक्यातील ओबीसी संघटनेच्यावतीने १५ ऑगस्टला तहसील कार्यालयातील शासकीय ध्वजारोहणास अर्धनग्नावस्थेत राष्ट्रध्वजाला सलामी देऊ, यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना अशोक गावतुरे, भजन मोहुर्ले, राष्ट्रपाल नखाते, राहूल मांडवे, महादेव बन्सोड, भुमेश्वर शेंडे, आसाराम सांडील, राजन मेर्शाम, शिखा शेंडे, हेमलताबाई शेंडे, मधुकर शेंडे, विनोद गुरनुले, गोपाल मोहुर्ले, मुरलीधर शेंडे, गजानंद मोहुर्ले, केशव मोहुर्ले, राकेश शेंडे, विठ्ठल शेंडे, प्रा. पि. के. चापले, नंदकिशोर वैरागडे, नितीन शेंडे, धमेंद्र येवले, जितेंद्र मोहुर्ले, शेषराव मोहुर्ले, प्रदीप गावतुरे, खुशाल जनते, अनिल उईके, विनोद गुरनुले, हेमंत शेंडे, हंसराज मोहुर्ले, अशोक गुरनुले, अक्षय मोहुर्ले, महेश शेंडे, मुकेश मोहुर्ले, कृषी मोहुर्ले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसींचे तिसरे महाअधिवेशन ७ ऑगस्टला मुंबईत
गोंदिया- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन येत्या ७ ऑगस्ट रोजी मुबंई येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते एकाच मंचावर येणार आहेत. ओबीसी महाधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरु झाली असून विविध राज्यातून ओबीसी पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा प्रतिसाद मिळत आहे.या अधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकारी,कार्यकर्त,अधिकारी, कर्मचारी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुबंईच्या नॅशनल स्पोट्र्स कल्ब ऑफ इंडिया डोम ,लाला लजपतराय मार्ग,हाजी अली जवळ मंडल आयोग दिनी आयोजित या महाअधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे हस्ते होणार असून याप्रसंगी हंसराज अहीर, केन्द्रीय गृहराज्यमंत्री,अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच उद्घाटन कार्यक्रमास आमदार छगनराव भुजबळ, आमदार एकनाथराव खडसे,आमदार जयदत्त क्षिरसागर,माजी आमदार माणिकराव ठाकरे मुख्य अतिथी म्हणून तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे हे राहणार आहेत.पंकजाताई मुंडे मंत्री,महिला व बालकल्याण,दिपक सावंत,आरोग्यमंत्री,चंद्रशेखर बावनकुळे उर्जामंत्री,महादेवराव जानकर,दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री,प्रा.राम qशदे,विजाभज, इमाव व विमाप्र मंत्री,खासदार राजकुमार सैनी,खासदार डॉ.बी.नरसय्या गौड,खासदार राजीव सातव,आमदार विजय वडेट्टीवार,माजी खासदार नाना पटोले,आमदार सुनिल केदार,आमदार सुधाकरराव देशमुख,आमदार परिणय फुके,आमदार डॉ.आषिश देषमुख,अविनाश वारजुरकर,वामनराव चटप,डॉ.शकील उझ झमान अन्सारी,अविनाष लाड,डॉ.हरि एप्पन्नापल्ली,पुल्ली रवि,प्रमोद मानमोडे या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दुसèया सत्रात व्ही. ईश्वरैया माजी न्यायमुर्ती तथा माजी अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग,यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.अधिवेशनाच्या दुसèया सत्राचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक तथा माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे हे राहणार आहेत. तसेच खासदार ताम्रध्वज शाहु,माजी खासदार व्ही हनुमंतराव,माजी आमदार अब्दुल सत्तार,माजी आमदार सेवक वाघाये,माजी आमदार अनंतराव घारड,अशोक सैनी,इकबाल अन्सारी,विश्वनाथ पाटील,चंद्रकांत बावकर,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे,प्रफुल गुडधे,नरेंद्र जिचकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महाअधिवेशनात देशातील ओबीसींच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीवर चर्चा होणार असून ओबीसींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढ्याची दिशा आणि दशा यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. ओबीसींवर सतत होणाèया अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे आयोजन करण्यात आले आहे.या अधिवेशनात ७ ऑगस्टला मंडल आयोग लागू झाल्याने ओबीसी दिवस म्हणून जाहिर करणे, ओबीसींची जनगणना जाहिर करणे, ओबीसींसाठी स्वंतत्र मंत्रालय स्थापन करणे, नॉन क्रिमिलेयरची असैवधानिक अट रद्द करणे, ओबीसींच्या रिक्त जागा भरण्यासाठी स्वंतत्र विशेष अभियान चालविणे, शेतकèयाना वयाच्या ६० वर्षानंतर पेंशन लागू करणे, मंडल आयोग, नच्चीपन कमिटी व स्वामीनाथन आयोगाच्या शिपारशी लागू करणे, ओबीसीसांठी विधानसभा व लोकसभेत स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात यावे आदी मागण्यासह ओबीसी आयोगाला सवैधानिक दर्जा देण्यावर चर्चा होणार आहे. या महाधिवेशनाला देशातील सर्व ओबीसी बांधवांना या महाअधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे, राजकीय समन्वयक डॉ.खुशाल बोपचे,सहसचिव खेमेंद्र कटरे, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे,कैलाश भेलावे, शिशिर कटरे, प्रा.बी.एम.करमकर,आनंदराव कृपाण,प्रा.एच.एच.पारधी, विनायक येडेवार,हरिष कोहळे,राजेश नागरीकर, तिर्थराज हरिणखेडे, गणेश बरडे,दिनेश हुकरे, दिलीप चव्हाण,प्रा.काशिराम हुकरे,लक्ष्मण नागपुरे,एस.यु.वंजारी, प्रा.राजेंद्र पटले,पारस कटकवार,जिवन लंजे,अनिल मुनेश्वर प्रा.संजीव रहांगडाले, सावन कटरे, हरिष ब्राम्हणकर, मनोज डोये, मनोज शरणागत,तुलसीदास झंझाड, विनोद चौधरी,सुनिल भोंगाडे, लिलेश रहागंडाले,जितेश राणे, गुड्डू कटरे, चौकलाल येळे, हरिष कोहळे, बी.जी.पटले, उध्दव मेहंदळे, भरत शरणागत, सुनिल पटले, संतोष वैद्य, राजेश कापसे,सावन डोये,महेंद्र बिसेन,चंद्रकुमार बहेकार, प्रेमलाल साठवणे दिनेश तिरालेसह ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघ गोंदियाने केले आहे.
लाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंच जाळ्यात
मौदा,दि.24(प्रा.शैलेष रोशनखेडे)ः- तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांने कंत्राटदाराचे ग्रामपंचायत भवन बांधकामाचे धनादेश काढण्यासाठी मागितलेली 70 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही घटना आज मंगळवारला घडली.ग्रामसेवक कैलास दयाराम मानकर (वय 36) आणि सरपंच विट्ठल शिवचरण डोंगरे (वय34) अशी लाच घेणार्यांची नावे आहेत. कंत्राटदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर सापळा रचण्यात आला असता 70 हजार रूपयाची लांच सरपंच व ग्रामसेवकांने स्विकारली. 4 लाख 8 हजार 346 रुपयाचा धनादेश काढण्यासाठी लाच मागण्यात आली होती.
श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा १५ ऑगस्टला
गोंदिङ्मा,दि.२५: श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सभारंभ बुधवार १५ ऑगस्ट रोजी राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे,माजी खासदार नाना पटोले,खासदार अशोक नेते, आमदार परिणय फुके,आमदार विजय रहांगडाले,आमदार संजय पुराम, माजी आ‘दार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, शिव शर्मा, जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,अशोक अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणा-या विविध पुरस्कारासाठी जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, स्तंभलेखक, छायाचित्रकार, वृतवाहिनी पत्रकाराकडुन पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका ९ ऑगस्ट पर्यंत जमा करावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक सावन डोये यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात संघाच्या कार्यकारीची बैठक नुकतीच शासकिय विश्रामगृहात पार पडली. या सभेतच टिळक गौरव पुरस्कारासाठी दैनिक लोकमत समाचार चे सहाय्यक संपादक विकास बोरकर यांची २०१८ च्या टिळक गौरव पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली.पुरस्कारासाठी १ मे २०१७ ते १ जुन २०१८ या दरम्यान प्रकाशित बातम्या, लेख, व संपादकीय ग्राह्य धरले जातील प्रवेशिका दोन प्रतीत मुळ कात्रण व स्पर्धेकांच्या अद्यावत छायाचित्रासह सादर करणे आवश्यक राहील. मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिकावर विचार करण्यात येणार नाही.जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
बदल्या होऊन महिना लोटला मात्र कर्मचारी मुख्यालयातच
गोंदिया,दि.२५-जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत.जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीतून बदली झालेल्या कर्मचाèयांना त्वरीत बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश दिले.मात्र मुख्यालयातील कर्मचाèयांना मोकळीक का अशा प्रश्न विचारला जात आहे.पंचायत समितीतील कर्मचाèयांसाठी वेगळा नियम व जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाèयांसाठी शासनाने वेगळा नियम तयार केला काय अशी विचारणा होऊ लागली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपण प्रशासनात तज्ञ असल्याचे सांगत प्रत्येक गोष्टीत नियम सांगत असताना मुख्यालयातील कर्मचाèयांना सोडण्यात ते मागे पडले अशाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अजूनही प्रशासकीय बदली झालेल्या कर्मचाèयांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविले जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या कर्मचाèयांची बदली करण्याचा नियम आहे. यात काही कर्मचारी तर १० वर्षांपासून मुख्यालयात आहेत. त्यांच्या बदलीबाबत कुठलीही फाईल फिरत नसल्याने त्यांचे प्रशासनातील वरिष्ठांशी साटेलोटे असल्याचे चर्चिले जात आहे.काही तर आपली बदली थांबविण्यासाठी मुख्यालयातच चकरा मारत बसले आहेत.वित्तविभागाशी संबधित तर बांधकाम व लेखा विभाग मिळावा यासाठी हेलपाटे मारतांना दिसून येत आहेत.
Tuesday, 24 July 2018
मध्यप्रदेशातील माफियांकडून खुलेआम वाळूचोरी
गोंदिया, दि.२४:: जिल्ह्यातील वाळूघाटावरून माफियांनी वाळूची चोरी करू नये म्हणून डड्ढोनच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. परंतु, केवळ प्रात्यक्षिकानंतर एकदाच डड्ढोन वापरण्यात आले. त्यानंतर हा डड्ढोनच प्रशासनाने कोमात पाठविला. यामुळे माफियांनी परत वाळू चोरीला सुरुवात केली आहे.मध्यप्रदेशातील काही वाळूमाफियांनी गोंदियातील वाळूव्यवसायीकांशी हातमिळवणी करीत हा धंदा जोरात चालविला आहे.विशेष म्हणजे याप्रकरणात जिल्हाप्रशासनाचेही काही हात काळेबोरे दिसून येत आहेत.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार पाच वर्षात जे खनिकर्म अधिकारी म्हणून कार्यरत राहिले त्या सर्वांची आर्थिक तपासणी पारदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर केली तर हा विभाग कसा सुखी आहे हे चित्र स्पष्ट होत या विभागातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्यास मदत होईल.
आगामी काळात गोंदिया जिल्ह्यात डड्ढोन हे हवाई तंत्रज्ञान प्रात्यक्षिकापुरतेच मर्यादित राहणार काय, असा सवाल महसूल प्रशासनातील काही अधिकाèयांकडून विचारला जात आहे. जिल्ह्यातून वाहणाèया वैनगंगा, वाघ, चुलबंद आणि शशीकरण या नदीपात्रात २३ वाळूघाट आहेत. यातील नक्षलबहुल भागातील वाघ नदीच्या पात्रात जवळपास अर्धा डझन वाळूघाट आहेत.दरवर्षी, जिल्ह्यातील माफियांसह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील माफिया येथील वाळू चोरट्या मार्गाने नेत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाला प्राप्त झाल्या आहेत. यामुळेच डड्ढोनच्या माध्यमातून नियंत्रण हा एकमेव पर्याय राज्य शासनानेही समोर केला होता. सुरुवातीला नागपुरातील खापरखेडा परिसरातील घाटावरही याचा प्रयोग तेथील जिल्हाधिकाèयांनी यशस्वी केला. त्याचे परिणाम हातात आले. परंतु, गोंदियामध्ये डड्ढोन तंत्रज्ञानाला लकवा मारल्याचा प्रकार सुरू झाला. या तंत्रज्ञानाचा वापर का बंद करण्यात आला, याबाबत प्रशासनातील कुठलाही मोठा अधिकारी बोलायला तयार नाही. वैनगंगेच्या पात्रातील घाटकुरोडा, देवरी, पिपरिया हे घाट अतिशय संवेदशील आहेत. प्रात्यक्षिकानंतर एकदा संवेदनशील वाळूघाटावर डड्ढोनने निगराणी केल्यानंतर त्यातील अपडेट व किती वाळूमाफियांनी वाळूची तस्करी केली, याचा काहीच तपशिल प्रशासनाकडे उपलब्ध नाही. एकंदर हे डड्ढोन तंत्रज्ञान जिल्हा प्रशासनालाच नको आहे, हे सिद्ध होत आहे..
गोंदिया, दि.२४:: जिल्ह्यातील वाळूघाटावरून माफियांनी वाळूची चोरी करू नये म्हणून डड्ढोनच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. परंतु, केवळ प्रात्यक्षिकानंतर एकदाच डड्ढोन वापरण्यात आले. त्यानंतर हा डड्ढोनच प्रशासनाने कोमात पाठविला. यामुळे माफियांनी परत वाळू चोरीला सुरुवात केली आहे.मध्यप्रदेशातील काही वाळूमाफियांनी गोंदियातील वाळूव्यवसायीकांशी हातमिळवणी करीत हा धंदा जोरात चालविला आहे.विशेष म्हणजे याप्रकरणात जिल्हाप्रशासनाचेही काही हात काळेबोरे दिसून येत आहेत.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार पाच वर्षात जे खनिकर्म अधिकारी म्हणून कार्यरत राहिले त्या सर्वांची आर्थिक तपासणी पारदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर केली तर हा विभाग कसा सुखी आहे हे चित्र स्पष्ट होत या विभागातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्यास मदत होईल.
आगामी काळात गोंदिया जिल्ह्यात डड्ढोन हे हवाई तंत्रज्ञान प्रात्यक्षिकापुरतेच मर्यादित राहणार काय, असा सवाल महसूल प्रशासनातील काही अधिकाèयांकडून विचारला जात आहे. जिल्ह्यातून वाहणाèया वैनगंगा, वाघ, चुलबंद आणि शशीकरण या नदीपात्रात २३ वाळूघाट आहेत. यातील नक्षलबहुल भागातील वाघ नदीच्या पात्रात जवळपास अर्धा डझन वाळूघाट आहेत.दरवर्षी, जिल्ह्यातील माफियांसह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील माफिया येथील वाळू चोरट्या मार्गाने नेत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाला प्राप्त झाल्या आहेत. यामुळेच डड्ढोनच्या माध्यमातून नियंत्रण हा एकमेव पर्याय राज्य शासनानेही समोर केला होता. सुरुवातीला नागपुरातील खापरखेडा परिसरातील घाटावरही याचा प्रयोग तेथील जिल्हाधिकाèयांनी यशस्वी केला. त्याचे परिणाम हातात आले. परंतु, गोंदियामध्ये डड्ढोन तंत्रज्ञानाला लकवा मारल्याचा प्रकार सुरू झाला. या तंत्रज्ञानाचा वापर का बंद करण्यात आला, याबाबत प्रशासनातील कुठलाही मोठा अधिकारी बोलायला तयार नाही. वैनगंगेच्या पात्रातील घाटकुरोडा, देवरी, पिपरिया हे घाट अतिशय संवेदशील आहेत. प्रात्यक्षिकानंतर एकदा संवेदनशील वाळूघाटावर डड्ढोनने निगराणी केल्यानंतर त्यातील अपडेट व किती वाळूमाफियांनी वाळूची तस्करी केली, याचा काहीच तपशिल प्रशासनाकडे उपलब्ध नाही. एकंदर हे डड्ढोन तंत्रज्ञान जिल्हा प्रशासनालाच नको आहे, हे सिद्ध होत आहे..
खा.नेतेनी घेतली ना.मेनका गांधीची भेट
गडचिरोली,दि.24ः- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यानी दिल्ली येथे महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती मेनका गांधी यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील मार्शल आर्टपट्टू कु.ऐंजल विजय देवकूडे (वय 10) बद्दल माहिती देत राष्ट्रपती बालपुरस्काराने सन्मानित करण्यासंबधिचे निवेदन सादर केले. लहान वयात एंजेलने मार्शल आर्ट मध्ये राज्य पातळीवर व आंतरराष्ट्रीय खेळात उत्तम कामगिरी केल्याची माहितीही दिली.यावेळी स्वीय सहाय्यक रविन्द्र भांडेकर ,गड़चिरोलीचे अनूप अध्येकीवार, सावलीचे आनंद खजांची,गौरव मडावी व इतर उपस्थित होते.
भाजप ओबीसी आघाडीचा गोंदिया जिल्हा मेळावा बुधवारला
गोंदिया,दि.२४-भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवार २५ जुर्ले रोजी येथील प्रीतम लॉन येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी,विदर्भ मोर्चा अध्यक्ष सुभाष घाटे,पालकमंत्री राजकुमार बडोले,आमदार डॉ.परिणय फुके,विजय रहागंडाले,संजय पुराम,प्रदेश सचिव अॅड.विरेंद्र जायस्वाल,जिल्हाध्यक्ष डॉ.अमित बुध्दे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन यशंवत मानकर,नितिन कटरे,अनिता चन्ने,जय विश्वकर्मा,सुरेश तितिरमारे,किशोर पटेल व बंडू कनोजिया यांनी केले आहे.
Monday, 23 July 2018
देवरीत पोलिस विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन
देवरी,दि.23- 'नक्षल
दमन सप्ताह' अंतर्गत
देवरी तालुक्यातील देवरी आणि बोरगाव बाजार येथे पोलिस विभागाच्या वतीने 'नक्षलवाद-
लोकशाही व विकासाचा शत्रू ' या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते.

या
स्पर्धेत शिवाजी विद्यालय, मनोहरभाई
पटेल विद्यालय, सिद्धार्थ
विद्यालय डवकी, शासकीय
आश्रमशाळा शेंडा, वसंत
विद्यालय डोंगरगावसडकच्या 93 कनिष्ठ
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला. यावेळी स्पर्धक
विद्यार्थ्यांनी वरील विषयावर आपले विचार अत्यंत खुलेपणाने व्यक्त केले. प्रत्येक
स्पर्धक वक्त्याने नक्षलवाद हा देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला कसा बाधक आहे, हे उपस्थितांना पटवून
देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,
काही स्पर्धकांनी शासकीय उणिवा ह्या पोलिसांना आपले कर्तव्य बजावत
असताना कशा आड येतात, यावर
सुद्धा आपले मत मांडले. प्रत्येक भारतीयाने आपली उर्जा सकारात्मक कार्यात लावून
गरीब आणि आदिवासी भागातील अल्पशिक्षित नागरिकांच्या विकासात आपला हातभार लावला
पाहिजे, असेही या
विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक
यांच्याच सुसंवाद प्रस्थापित होत असल्याचे अधोरेखित झाले. यावेळी पोलिस उपविभागीय
अधिकारी ढोले यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे उत्तम प्रबोधन
केले. याभागातील नागरिक हे प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत असल्याचे मत त्यांनी
व्यक्त केले. याभागात अनेक उर्जावान व्यक्तीसाधन असल्याचे सांगत त्यांना सकारात्मक
सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान
या स्पर्धेत चतुष्का कोमल मेश्राम, भावना भोजराज
घासले आणि मीनाक्षी रवींद्र कावळे या विद्यार्थींना अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय पुरस्कार
देऊन गौरान्वित करण्यात आले. संचलन कुलदीप लांजेवार यांनी केले.
दरम्यान, तालुक्यातील बोरगाव बाजार
येथील शासकीय आश्रमशाळेत चिचगड पोलिस स्टेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. यामध्ये एकूण 22 विद्यार्थी
सहभागी झाले होते. रुपा मेश्राम,
राहुल कोसरकर,प्रियंका
नेताम या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांना चिचगडचे ठाणेदार
नागेश भास्कर यांनी मोमेंटो देऊन सत्कार केला. पोलिस ठाणे हद्दीतील इतरही ठिकाणी
स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 59 स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला
आश्रमशाळेचे प्राचार्य भाकरे, मुख्याध्यापक
खांडवाये,एन जी
गावळ पोलिस निरीक्षक माळी आदी मान्यवर उपस्थित होते. संचलन
पोलिस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी केले.
आजपासून अटल विश्वकर्मा सन्मान योजना विशेष नोंदणी अभियान
गोंदिया,,दि.23ः- – कामगार विभाग व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात 23 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
सडक अर्जुनी तालुका 23 जुलै धम्मसाधना केंद्र विहार सौंदड, 24 जुलै खोडसशिवनी, 25 जुलै कोसमतोंडी, 26 जुलै दुर्गा मंदिर सभागृह डव्वा, 27 जुलै पांढरी, 30 जुलै डोंगरगाव, 31 जुलै रेंगेपार दल्ली 1 ऑगस्ट ग्राम पंचायत भवन डूग्गीपार, 2 ऑगस्ट ग्राम पंचायत हॉल चिखली व 3 ऑगस्ट गुरुदेव सेवा आश्रम हॉल कोकणा अर्जुनी मोरगाव तालुका 23 जुलै कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगावबांध, 24 जुलै ग्राम पंचायत पिंपळगाव, 25 जुलै ग्राम पंचायत बाराभाटी, 26 जुलै ग्राम पंचायत अरुण नगर, 27 जुलै ग्राम पंचायत केशोरी, 30 जुलै ग्राम पंचायत गोठणगाव, 1 ऑगस्ट ग्राम पंचायत धाबेपौनी, 2 ऑगस्ट ग्राम पंचायत महागाव व 3 ऑगस्ट ग्राम पंचायत इटखेडा या ठिकाणी विशेष नोंदणी अभियान आयोजित केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी फी 25 रुपये एवढी आहे वर्गणी दरमहा 1 रूपया फक्त पाच वर्षाकरीता केवळ 60 रुपये वर्गणी आहे. नोंदणी करिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रत व पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. या अभियानात जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
देवरी नगर पंचायतीसाठी पाच कोटी मंजूर
देवरी,दि.२३ः- येथील नगरपंचायतीच्या विविध विकास कामासाठी देवरी-आमगाव मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देवरी नगर पंचायतीकरिता पाच कोटी विकास निधीची मागणी केली होती. यात त्यांना यश आले असून नगर पंचायतीला पाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून त्याचे पत्र २१ जुलै रोजी नगर पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ. पुराम यांनी नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख, मुख्याधिकारी चिखलखुंदे यांना दिले.
यावेळी आ. पुराम यांनी सांगितले की, देवरी शहराच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांकडून पाच कोटी मंजूर करवून घेतले असून मुख्यमंत्री निधीतून देखील नगर विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील नगर विकासासाठी आ. पुराम यांनी नऊ कोटी रुपये प्राप्त करून दिले असून या निधीतून नियोजनपूर्ण विकास कामे सुरू असल्याचे मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी सांगितले.
यावेळी नगर पंचायतीला मिळालेल्या अग्निशमन वाहनाची पापंचायतीला मिळालेल्या अग्निशमन वाहनाची पाहणी आ. पुराम यांनी केली. त्यांच्यासोबत नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रविण दहीकर, रितेश अग्रवाल, नेमीचंद आंबीलकर, नगरसेवक भूमिका बागडे, कोकीला दखने, माया निर्वाण, भेलावे आदी उपस्थित होते.
नक्षल दमन सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
गोंदिया,दि.23- 'नक्षल दमन सप्ताह' अंतर्गत देवरी पोलिसांच्या वतीने जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षली दरवर्षी नक्षल शहिद सप्ताहाचे आयोजन करीत असतात. या दरम्यान अनेक हिंसक कारवाया घडवून आणून राष्ट्रीय मालमत्तेची हानी आणि जीवहानी मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांकडून केली जाते. या कारवायांनी पायबंद घालण्यासाठी पोलिस विभागाकडून नक्षलदमन सप्ताहादरम्यान अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांना मार्गदर्शन आणि जाणीव जागृतीचे कार्य राबविले जाते.
या अंतर्गत गेल्या 24 एप्रिल 1993 रोजी देवरी तालुक्यातील मंगेझरी या गावात झालेल्या भूसुरुंगस्फोटात शहीद झालेल्या 7 लोकांचे स्मारक बांधकामास सुरवात करण्यात आले आहे. गेल्या 21 तारखेला "नक्षलवाद- आदिवासी जनतेवरील क्रूर अत्याचार" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 7 शाळेतील 166 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. आज दि.23 रोजी "नक्षलवाद- लोकशाही व विकासाचा शत्रू" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 5 शाळेतील 44 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.
चिचगड येथे वृक्षारोपन

यावेळी चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर, वनपरिक्षेत्राधिकारी काशिकर, पोलिस उपनिरीक्षक गागोर्डे डोंगरगावचे क्षेत्रसहाय्यक सरकार, वनरक्षक औरासे, पोलिस शिपाई अतकर, जांगळे, भुरे, राजाभोज,शहारे,बिसेन, ग्रा.पं. सदस्य शाहीद सय्यद , सुरेश गिऱ्हेपुंजे आदी मान्यवर उपस्थित
होते.
होते.
Sunday, 22 July 2018
प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा
सडक अर्जुनी,दि.22ः-तालुक्यातील शेंडा-कोयलारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्याचा त्रास रुग्णांना होत आहे.
शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र व २७ गावांचा समावेश आहे. वेळोवेळी प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या सभा, सर्व्हे रिपोर्टींग, कार्यालयीन रेकार्ड व कुटूंब नियोजन यासारखे विविध कार्यक्रम राबविले जातात. मात्र आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून स्थायी आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका, औषधी निर्माता, लिपिक, सुपरवाईजर तसेच दल्ली उपकेंद्रातर्गंत आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बरेचदा रुग्णांवर वेळीच उपचार केला जात नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराचे रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बरेचदा रुग्णांना उपचार न घेताच परतावे लागते.
हा परिसर आदिवासीबहुल, अतिदुर्गम व नक्षलक्षेत्रात मोडतो. तसेच परिसरातील हे एकमात्र आरोग्य केंद्र असल्याने उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. जवळपास सरकारी अथवा खासगी दवाखाने सुध्दा नाहीत. त्यामुळे १४ किमीवर सडक-अर्जुनी व २० किमी अंतरावर असलेल्या देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
येथील आरोग्य केंद्रातून इतरत्र स्थानांतर झालेल्या अथवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची अद्यापही नियुक्ती करण्यात आली नाही.
तरी जनतेचे हित लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जातीने लक्ष देवून रिक्त पदे भरावी, अशी मागणी या परिसरातील जनतेने केली आहे.
आरक्षण संपवण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई,दि.22: भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आरक्षण संपवणे हा अजेंडा असून राज्य सरकारने त्यासाठीचे निर्णय घेतले आहेत. असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज केला. मात्र सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असे आवाहन करत मोदी सरकारच्या धोरणावर भुजबळ यांनी जोरदार टीका केली. मुंबई राष्ट्रवादी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. लोकांच्या हितासाठी ताठ मानेनं उभे राहा असा सल्ला देताना ते म्हणाले की, आंदोलन करायला घाबरू नका. अटक होईल म्हणून मागे हटू नका. मला स्वत:ला अनेक आंदोलनांमध्ये अटक झाली पण मी डगमगलो नाही. लोकांसाठी झोकून द्या. असे भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. दरवेळी कायदा हातात घेवूनच आंदोलनं केले पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Saturday, 21 July 2018
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड
तिरोडा,दि.21ः- तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.रस्त्याच्या दयनिय स्थितीमुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये तिरोडा, घाटकुरोडा-घोगरा मार्गे देव्हाड्याला जाणारी एसटी बस बंद केली जाते. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची फजिती होते. शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे, याकरिता जि.प. सदस्य डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये एक उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यावर मोठ्या स्वरुपाचे खड्डे तयार झाले असून त्या खड्यांत वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच देव्हारे, तंमुस अध्यक्ष सुरेश भांडारकर, ग्रा.पं. सदस्य गंगाधर भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था खूप वाईट असते. त्यामुळे पावसाळ्यात बसेस बंद असतात. जनता व विद्यार्थ्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. घाटकुरोडा, घोगरा व देव्हाडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करुन रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या रस्त्याचे काम १२ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावरुन पाच रेतीघाट पडतात. यात घाटकुरोड्याचे दोन व ग्राम चांदोरी, बिरोली आणि मुंडीपार येथील प्रत्येकी एक. या घाटावरील रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांची संख्या ५०० ते ५५० च्यावर असून सातत्याने वर्दळ असल्याने रस्त्याचे पूर्ण बेहाल झाले आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने उन्हाळ्यात धूळ घरात जाते. पावसाळ्यातील खड्ड्यात साचलेले पाणी लोकांच्या अंगावर व घरात शिरत आहे. तरी प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित झाला आहे. रेतीघाटच्या कंत्राटदारांना बोलण्याचा प्रयत्न गावकरी करतात तर त्यांच्याशी अरेरावीपणा केली जाते, अशी माहिती जि.प. सदस्य डोंगरे, घोगराच्या सरपंच गीता देव्हारे, पोलीस पाटील चंद्रºहास भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांनी दिली.
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांना अनुदानच नाही
नागपूर,दि.21 : राज्यातील अनुसूचित जातींच्या मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या ३२२ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्राकडून अनुदानच दिले नसल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी उत्तरात दिली आहे. ३२२ पैकी केवळ ३४ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर केल्याचे बडोले यांनी सांगितले आहे. या ३२२ पैकी १६० शाळांना अनुदान देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. केंद्रीय निवासी आश्रमशाळांना अनुदान देण्यात येत नसल्याने संस्थाचालकांनी मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा एप्रिल महिन्यात दिला होता. या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह १७ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाच्या उत्तरात बडोले यांनी सांगितले की, केंद्र पुरस्कृत अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा योजनेकरिता राज्य शासनाने शिफारस केलेल्या ३२२ पैकी फक्त ३४ आश्रमशाळांना अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित आश्रमशाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर केले नसल्याने तसेच लोकप्रतिनिधींकडून अनुदान मिळण्याबाबत केलेली मागणी विचारात घेऊन या आश्रमशाळांकरिता राज्याची योजना तयार करून त्यांना अनुदान देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असे मंत्री बडोले यांनी लेखी उत्तरात सांगितले.
जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करा
गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.21ः- जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी अहेरी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून २६ ऑगस्ट १९८२ रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा मुख्यालयापासून ११0 किमी अंतरावरील अहेरी, २१0 किमी अंतरावरील सिरोंचा, १८२ किमी अंतरावरील भामरागड व १३0 किमी अंतरावरील एटापल्ली तालुके अतिशय दुर्गम असून येथील सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी नागरिकांना जिल्हा विभागणीचा कोणताही फायदा झालेला नाही. येथील जनतेला जिल्हा मुख्यालयात जाऊन शासकीय कामे करू गावी परत येणे एका दिवसात होत नाही. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर २८0 किमी पडत असल्यामुळे त्यांना शासकीय कामासाठी २ ते ३ दिवस मुक्कामी राहून आपली कामे करून परत यावे लागते.
या क्षेत्रातील आजही काही गावात शासन, प्रशासनातर्फे वीज, रस्ते, पूल उभारण्यात आलेले नाही. अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुके वनव्याप्त असून या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवानाची झाडे असल्या कारणाने या झाडांची विक्री करून शासनास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होत असतानाही या भागात शासनाचा निधीच पोहोचत नसल्याने विकासाची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील या तालुक्यातील समस्या कायमस्वरूपी सोडवायच्या असल्यास शासनाने तत्काळ अहेरी जिल्हा घोषित करणे आवश्यक आहे. यावर तत्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना युवक कॉंग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष महाराज परसा व पदाधिकारी उपस्थित होते.
गुन्हेगारीवर आळा घालण्याचे अधिकार्यांना निर्देश
चंद्रपूर,दि.21ःःमुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलिस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलिस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्य़ांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक स्तरावर असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाद्वारे अशा गुह्य़ांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कठोर कारवाईची भूमिका स्वीकारावी, असे सक्त निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिस अधिकार्यांना दिले.
स्थानिक शासकीय विर्शामगृहात मंगळवारी जिल्ह्य़ातील विविध प्रकारच्या गुन्हे विषयक प्रकरणांचा जिल्हा पोलिस प्रशासनाकडून त्यांनी आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर व प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये ना. अहीर यांनी अनेक गंभीर गुन्ह्य़ाकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी तपास कार्याला गती द्यावी, तपास अधिकार्यांना कालबध्द अवधीमध्ये तपासाचा छडा लावण्याची सूचना द्यावी व अशा गंभीर प्रकरणांच्या तपास प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी आढावा घेऊन कार्य अहवाल मागवावा, अशी सूचनाही ना. अहीर यांनी यावेळी केली. फुस लावून पळवून नेलेल्या १८ वर्षांखालील मुलींची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली जावी, भादंवि कलम ३७६, ३५४ व पास्को यासारख्या कलमांचा अपराधाची तीव्रता व परिस्थितीजन्य पुराव्याच्या पार्श्वभूमिवर वापर केला जावा. तरच अशा असामाजिक कृत्य करणार्या प्रवृत्तींवर पायबंद घालणे शक्य होईल. सन २0१३ ते २0१७ पयर्ंतच्या गुन्हेविषयक अहवालानुसार अपहरण, फुस लावून व लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन व सज्ञान मुली पळवून नेण्याचे आकडे चिंतेत भर घालणारे आहे, असे ना. अहीर म्हणाले. या बैठकीला विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत, एसडीपीओ सुशिलकुमार नायक, शेखर देशमुख, पवार, हिरे, पोलिस निरीक्षक गोतमारे, भगत, आमले, शिरस्कर यांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Posts (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...