गडचिरोली/आलापल्ली,03-भामरागड उपविभागांतर्गत येत असलेल्या कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोपर्शी जंगल परिसरात काल २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास झालेल्या पोलिस - नक्षल चकमकीत एका जहाल नक्षल्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनास्थळावरून दोन हत्यारांसह मोठ्या प्रमाणत नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
कोपर्शी जंगल परिसरात पोलिस नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असताना अज्ञात नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. चकमकीदरम्यान एका जहाल पुरूष नक्षल्याचा खात्मा करण्यात आला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. घटनास्थळावरून मृतदेहासह १ एसएलार रायफल, एक एअर रायफल, ब्लाॅस्टिंगचे साहित्य नक्षल लिखीत पुस्तके, मोबाईल संच, १ खेचर तसेच इतर साहित्य आढळून आले.
No comments:
Post a Comment