संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटविला
देवरी,01- येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या शिलापूर नजीक झालेल्या ट्रॅक्टर अपघातात एका दोन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना नुकतीच दुपारी तीनच्या सुमारास घडल्याचे देवरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संतप्त जमावाने ट्रॅक्टर जाळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मृत बालकाचे नाव डेवीड रामकृष्ण चुटे (वय2) राहणार शिलापूर असे आहे. उल्लेखनीय म्हणजे येत्या चार तारखेला त्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या कुटुंबाचा मानस असल्याचे सांगण्यात येते.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यात अवैध रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अवैध व्यवसायाला राजकीय संरक्षण प्राप्त असल्याने तालुका प्रशासन हे नेत्यांच्या ताटाखालचे मांजर झाले असल्याच्या भावना घटनास्थळी नागरिक व्यक्त करीत होते.
घटनेच्या वेळी शिलापूर येथील जागेश्वर भोयर यांच्या मालकीचे दोन आणि एक इतर असे तीन ट्रॅक्टर अवैध रेतीची उपसा करून वाहतूक करण्याच्या इराद्याने शिलापूर घाटाकडे जात होते. दरम्यान, ट्रॅक्टर क्र. MH35-G-1602 आणि ट्रॉली क्र MM 35-F-1614 चा चालकअनिल नरेटी (वय42) राहणार डवकीटोला याने आपल्या ताब्यातील वाहन बेजबाबदार रीत्या चालविल्याने डेवीड नावाचा लहानसा बालक त्याच्या ट्रॅक्टरखाली आल्याने जागीच गतप्राण झाला. यामुळे संतप्त जमावाने श्री भोयर यांचे ट्रॅक्टर अडविले तर एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला. अपघातग्रस्त ट्रॅक्टरला तणीस टाकून पेटवून जमावाने आपला रोष व्यक्त केला. देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार राजेश तटकरे यांच्या नेतृत्वात देवरी पोलिस करीत आहेत. वृत्त लिहीपर्यत जमाव शांत झाला नव्हता.
![]() |
| शिलापूर येथे झालेल्या ट्रॅक्टर अपघातात मृत बालक इन्सेटमध्ये. संतप्त जमावाने घटनास्थळावर टॅक्टरला आग लावली -(छाया महेंद्र वैद्य) |

No comments:
Post a Comment