Thursday, 2 November 2017

उपअधिक्षकासह लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

वाशिम,दि.2-जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालय  कारंजा येथे  उपअधीक्षक पदावर कार्यरत प्रभाकर मधुकर कोंजे आणि लेखापाल माणिक नारायण खंडारे या दोघांना शेतीची मोजणी शीट देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
तक्रारदाराची कारंजा तालुक्यातील  गायवळ येथे गट नंबर 40 शेती आहे दि 7 सप्टेंबरला भूमिअभीलेख कार्यालयाने शेताची मोजणी केली दि 10 ऑक्टोबर ला तक्रारदार कारंजा येथील भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी शीट मागण्यांसाठी गेले असता  उपअधीक्षक कोंजे आणि लेखापाल खंडारे यांनी 40 ते 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार तक्रारदाराने 25 ऑक्टोबर  ला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नोंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर ला पडताळणी केली असता दोघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने 1 नोव्हेंबरला सापळा रचला असता माणिक खंडारेला 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुनीता नाशिककर,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांचे व पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक ए. जी. रुईकर ,पोलीस उपनिरीक्षक एन. बी. बोऱ्हाडे व त्यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...