नवी दिल्ली,05- राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सक्तवसूली संचालनालय (ईडी)ने आज पुन्हा एक झटका दिला आहे. लालूंची कन्या मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांचा फार्म हाऊस ईडीने जप्त केला आहे.
दिल्लीच्या पालम येथील बिजवासन येथे मिसाचा हा फार्म हाऊस आहे. बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी मिसा आणि त्यांचे पती शैलेश कुमार ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे ईडीची आजची कारवाई ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी ईडीने ८ हजार कोटींची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मिसाच्या घरी छापा मारला होता. यापूर्वी मिसा आणि तिच्या पतीच्या नावाने नोंद असलेल्या तीन फार्म हाऊसची तपासणी करण्यात आली होती. मिशैल प्रिंटर्स अँड पॅकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शैलेश कुमार संचालक होते.

No comments:
Post a Comment