Thursday, 3 August 2017

आमगावला नगरपरिषदेचा दर्जा : जि.प.अध्यक्षांचे रद्द


गोंदिया,दि.03- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावे,यासाठी सुरु असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे.
 नगरविकास विभागाने २ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुका मुख्यालयी नगरपरिषद गठित करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहे.या आदेशात नवनिर्मित आमगाव नगरपरिषदेमध्ये आमगाव,बनगाव,रिसामा,कुंभारटोली,पदमपूर,किंडगीपार,बिरसी व माल्ही या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.नव्याने अस्तित्वात आलेल्या आमगाव नगरपरिषदेमध्ये पदमपूर व रिसामा हे क्षेत्र सहभागी झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष उषा मेंढे यांचे पद तसेच रिसामा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य सुखराम फुंडे यांचे पद हे आपोआप रद्द झाले आहेत. या दोन्ही सदस्यांवर आपले नव्या नगरपरिषदेच्या रचनेमुळे सदस्यत्व गमावण्याची वेळ आली आहे.आमगावला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याने तहसिलदार हे पहिले प्रशासक म्हणून लवकरच कामकाज हाती घेणार असल्याचे वृ्त्त आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...