Saturday, 5 August 2017

देवरी तालुक्यात संयुक्त शिक्षण परिषद

देवरी,05 (प्रतिनिधी)- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या फुटाना, चिचगड, पालांदूर आणि ककोडी केंद्रातील शाळांकरीता काल शुक्रवारी (ता.04) शालासिद्धी विषयाच्या संयुक्त शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
बोरगाव बाजार येथील शासकीय आश्रम शाळेत आयोजित या परिषदेच्या अध्यक्षस्थानी देवरीचे गटशिक्षणाधिकारी डी.बी. साकुरे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. श्रीखंडे, धनवंत कावळे, विजय लोथे, मस्के, उमेश भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेचे आयोजन फुटाणा केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर राऊत यांचे मार्गदर्शनात करण्यात आले होते. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सी.जे. हेमके, एन. एस. लंजे आदींनी सहकार्य केले. या परिषदेला फुटाणा, चिचगड, पालांदूर आणि ककोडी केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते



.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...