Saturday, 5 August 2017

डायट चमूची बिरसीच्या जि.प. शाळेला भेट

गोंदिया,05 -  शालेय प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन काल शुक्रवारी (ता.04) डॉयट चमूने आमगाव तालुक्यातील बिरसीच्या जि.प. प्राथमिक शाळेला अकस्मात भेट देऊन तपासणी केली.
या चमूमध्ये ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांडे, सरस्वती सूर्यवंशी, विषय शिक्षक जी.एम. बांते, दिनेश उके, सुनील हरिणखेडे यांचा समावेश होता. डॉ. धांडे यांनी परिपाठाच्या वेळेत दिलेल्या भेटीत इयत्ता 3रीच्या काजल या विद्यार्थिनीला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान चमूतील सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक विकासाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल डॉयटच्या चमूने मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे यांचे सह सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...