चीन सरकारने आयोजित केलल्या दौऱ्यातील भारतीय पत्रकारांच्या प्रश्नांना चिनी लष्करी अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. या वेळी चिनी लष्कराने प्रचारतंत्र रेटून नेले. सिक्कीमजवळील डोकलाम भागात दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘भारतीय जवानांनी चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे,’ असा दावा ली यांनी केला. ‘चिनी सैनिक काय विचार करतात याबद्दल तुम्ही बातमी देऊ शकता. मी सैनिक आहे. देशाच्या सीमांचे, सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्याला हा प्रश्न सोडवायला हवा,’ असे ली म्हणाले. भारतीय पत्राकारांना बीजिंगजवळील गॅरिसनमध्ये भेटीसाठी नेण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
हुएरो (वृत्तसंस्था)- ‘संघर्षाची स्थिती टाळण्यासाठी भारताने डोकलाम भागातून लष्कर माघारी घ्यावे,’ अशी धमकी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने पुन्हा एकदा दिली आहे. चिनी लष्कराचे वरिष्ठ कर्नल ली ली यांनी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली. भारताने डोकलाम भागातून लष्कर मागे घ्यावे, यासाठी चीनने प्रचारतंत्राचा अवलंब सुरू केला आहे. त्या अंतर्गत सातत्याने चिथावणीखोर विधाने करण्यात येत आहेत.
चीन सरकारने आखलेल्या या दौऱ्यात भारतीय माध्यमांसमोर चिनी लष्कराच्या युद्धकौशल्यांच्या प्रात्यक्षिकाचाही समावेश होता. त्यात छोट्या शस्त्रांनी शार्प शूटिंग कौशल्य, जवळच्या लढाईत शत्रू सैन्याला ताब्यात घेणे, दहशतवादविरोधी कारवाई; तसेच लेझर सिम्युलेशनचा समावेश होता. दरम्यान, या प्रात्यक्षिकांमागे डोकलाममधील घडामोडींची पार्श्वभूमी नाही, असा दावाही ली यांनी केला. डोकलाममध्ये ४८ भारतीय सैनिक बुलडोझरसह तळ ठोकून असल्याचे चीनने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment