देवरी,०५(प्रतिनिधी)- यावर्षी देवरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा दुष्काळसदृष्य परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू नये, यासाठी तालुका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भूजल उपस्यावर बंदी आणण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. भूजलाचा वापर नागरिकांनी qसचनासाठी करणे त्वरित बंद करण्याचे आवाहन तहसीलदार विजय बोरुडे यांनी तालुकावासीयांना केले असून आदेशाचे उल्लंघन करणाèयांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, महावितरणला अशा कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश देणार असल्याचेही श्री बोरुडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सविस्तर असे की, यावर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे पीक परिस्थिती धोक्यात आली आहे. शेतकèयांना धानाची रोवणी करण्याकरिता पाणी नाही. अशा परिस्थितीत ज्या शेतकèयांकडे बोरचे साधन आहेत, असे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भूजल साठ्याचा उपसा करीत आहेत. परिणामी, भूजल साठ्याने धोकादायक पातळी गाठली आहे. पावसाचे पाणी नसल्याने बोरच्या पाण्याने लावलेली शेती सुद्धा करपण्याच्या स्थितीत आहे. यामुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. तालुक्यातील तलाव, नदी, नाले आणि धरणात सुद्धा समाधान कारक साठा नाही. परिणामी, भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. अशा परिस्थिती भूजलाचा उपसा थांबविणे आवश्यक आहे. याशिवाय नवीन बोर करण्याला सुद्धा निर्बंध घालणारे आदेश प्रत्येक ग्रामपंंंचायतीला देण्यात आले असून कडक अंमलबजावणी करण्याची ताकीद दिल्याचे तहसीलदार बोरुडे यांनी सांगितले. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा यावेळी बोलताना श्री बोरुडे यांनी केले.
No comments:
Post a Comment