Tuesday, 8 August 2017

मुंबईत निघणार २५ लाखांचा महामोर्चा

मुंबई ,08- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा करत, नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, महामोर्चा हा मूक स्वरूपाचा असून, मुंबईच्या इतिहासात तो सर्वात मोठा असेल. आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.
मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...